Chetan Bodke
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच अनेक व्यक्ती उष्माघाताला बळी पडले आहेत.
ऊन तीव्र असल्याने अनेकांना डि-हायड्रेशन या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
चक्कर येणे, अशक्तपणा येणे, उन्हामुळे डोके दुखणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी पिल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. शरीर तंदुरुस्त आणि सुदृढ राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यामध्ये अनेक व्यक्ती थकवा दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस किंवा रसना म्हणजेच ज्यूस पावडर पितात.
संत्री आरोग्यासाठी थंड असते. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी संत्र्याचा रस बनवू शकता. यामध्ये थोडं दूध आणि मिल्क पावडर मिक्स करावी.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.