50-Year-Old Grandmother Marries Grandson Saam Tv
देश विदेश

Shocking News: ५० वर्षीय आजीनं नातवासोबतच केलं लग्न, ४ मुलं अन् नवऱ्याला सोडून पळाली

50-Year-Old Grandmother Marries Grandson: उत्तर प्रदेशमध्ये सध्या एका प्रेम कहाणीची जोरदार चर्चा होत आहे. ५० वर्षीय आजीने पळून जाऊन ३० वर्षीय नातवासोबत लग्न केलं. या लग्नाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

Priya More

उत्तर प्रदेशच्या बदायूंमधील सासू-जावयाची प्रेम कहाणी चर्चेत असतानाच उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक आश्चर्यचकीत करणारी घटना समोर आली आहे. आंबेडकरनगरमध्ये राहणारी आजी आपल्या नातवासोबत पळून गेली. या दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केले असून त्यांचे फोटो समोर आले आहेत. ५० वर्षीय आजी आपली ४ मुलं आणि नवऱ्याला सोडून नातवासोबत पळून गेली. हे प्रकरण बसखारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रतापपूर बेलवरिया गावातील आहे. सध्या या गावासोबत संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये आजी-नातवाच्या प्रेम कहाणीची चर्चा होत आहे.

बेलवरिया गावामध्ये राहणाऱ्या ५० वर्षीय इंद्रावतीचे तिच्याच शेजारी राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणासोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ३० वर्षीय आझाद इंद्रावतीचा नातू देखील लागतो. वयातील फरक आणि कौटुंबिक नात्यांची भिंत त्यांच्या प्रेमाला रोखू शकली नाही. हळूहळू दोघांमधील जवळीक इतकी वाढली की त्यांनी सर्व सामाजिक बंधने तोडून एकत्र राहण्याची शपथ घेतली. समाजाला झुगारून हे दोघे जण पळून गेले आणि त्यांनी मंदिरात जाऊन लग्न केले.

इंद्रावतीला चार मुलं आहेत. तिला दोन मुली आणि दोन मुलं आहेत. तिच्या एका मुलीचे आधीच लग्न झाले आहे. पती आणि ४ मुलांना टाकून इंद्रावती प्रियकरासोबत पळून गेली. दोघांनी गोविंदसाहेब मंदिरात सात फेरे घेत लग्न केले. लग्न केल्यानंतर दोघेही गावातून पळून गेले. अशी देखील माहिती समोर आली आहे की, पळून जाण्यापूर्वी इंद्रावतीचा नवरा चंद्रशेखरने दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पकडले होते. या प्रेमसंबंधाला विरोध असताना देखील दोघे वेगळे झाले नाही.

इंद्रावती आणि आझाद यांनी आपल्या मुलांच्या जेवणात विष मिसळण्याचा कट रचला होता असा आरोप इंद्रावतीच्या नवऱ्याने केला आहे. त्याने याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पण काहीच फायदा झाला नाही. नातवासोबत लग्न केल्यामुळे नाराज झालेल्या चंद्रशेखरने आता आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे मानले आहे. त्याने पत्नीच्या तेराव्याची देखील तयारी सुरू केली आहे. चंद्रशेखरचे इंद्रावतीसोबतचे हे दुसरे लग्न होते. शेजारी राहणाऱ्या नातवासारख्या तरुणाच्या प्रेमात पडून त्याच्याशी आजीने लग्न केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT