Manoj Bajpayee: ड्रामा स्कुलमध्ये प्रेम, मग लग्न आणि दोन महिन्यांतच डिव्होर्स; मनोज बाजपेयीची ट्रॅजिडीक लव्हस्टोरी

HBD Manoj Bajpayee: आज अभिनेता मनोज बाजपेयीचा वाढदिवस आहे. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सगळी माहिती त्याच्या चाहत्यांना माहिती असते. पण त्याचा वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांनां माहिती आहे.
HBD Manoj Bajpayee
HBD Manoj BajpayeeSaam Tv
Published On

Manoj Bajpayee: आज अभिनेता मनोज बाजपेयीचा वाढदिवस आहे. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सगळी माहिती त्याच्या चाहत्यांना माहिती असते. पण त्याचा वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांनां माहिती आहे. मनोजचे पहिले लहान हे फक्त २ महिने टिकले होते. त्याची पहिली पत्नी दिव्या आणि त्याची पहिली भेट ही दिल्लीतील 'अ‍ॅक्ट वन' थिएटर ग्रुपमध्ये असताना झाली. दिव्या, एक श्रीमंत कुटुंबातील मुलगी, त्या वेळी पदवी शिक्षण घेत असताना थिएटरमध्ये तिची रुची वाढली. कालांतराने त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.​

या प्रेमसंबंधाला पुढे नेत, मनोज आणि दिव्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. दिव्याच्या कुटुंबाला मनोजची आर्थिक स्थिती आणि त्याचे स्ट्रगलिंग अभिनेता असणे मान्य नव्हते. तरीही, दोघांनी दिल्लीच्या लक्ष्मी नगर येथील मंदिरात, पोलिस संरक्षणात, विवाह केला. या विवाहासाठी मनोजने स्थानिक पोलिसांची मदत घेतली होती, कारण दिव्याच्या कुटुंबाकडून धमक्या आल्या होत्या.​

HBD Manoj Bajpayee
Abir Gulaal: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'अबीर गुलाल' चित्रपटावर बंदीची मागणी; सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप

लग्नानंतर, मनोज आणि दिव्या यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी आल्या. मनोजचा संघर्ष सुरूच होता आणि दिव्यालाही हे जाणवू लागले की, त्यांनी घाईत आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन चुकीचा निर्णय घेतला. या आर्थिक तणावामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि केवळ दोन महिन्यांतच त्यांनी घटस्फोट घेतला.​

HBD Manoj Bajpayee
Phule: 'फुले' चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर; वादाच्या भोवऱ्यात अडकलेला चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

या घटनेनंतर, मनोज बाजपेयी मानसिकदृष्ट्या खचले होते. परंतु, त्याने स्वतःला सावरले आणि करिअरवर लक्ष केंद्रित केले. नंतर, त्याने अभिनेत्री शबाना रझा (पूर्वीची नेहा) हिच्याशी विवाह केला आणि सध्या ते एका आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत. मनोजच्या या पहिल्या प्रेमकथेने त्याच्या आयुष्यात एक वेगळे वळण आणले, ज्यामुळे त्याने आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com