Dilivery Boy Video  Saam Tv
देश विदेश

Shocking: पार्सल देताना महिलेच्या छातीला स्पर्श, डिलिव्हरी बॉयचं संतापजनक कृत्य; सीसीटीव्ही Video समोर

Delivery Boy Video: ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर संताप व्यक्त केला जात आहे. या डिलिव्हरी बॉयने महिलेसोबत भयंकर कृत्य केले. त्याने महिलेला वाईट पद्धतीने स्पर्श केला.

Priya More

Summary -

  • ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयने पार्सल देताना महिलेच्या छातीला स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • महिलेच्या तक्रारीनंतर ब्लिंकिटने डिलिव्हरी बॉयचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले.

सध्या सोशल मीडियावर ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयची जोरदार चर्चा होत आहे. एका महिलेने ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयने तिच्यासोबत केलेल्या धक्कादायक कृत्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. ऑर्डर देताना डिलिव्हरी बॉयने तिला वाईट पद्धतीने स्पर्श केला. या महिलेने सीसीटीव्ही फुटेज शेअर करत कंपनीकडे तक्रार केली आणि कारवाई करण्याची मागणी केली.

महिलेने सांगितल्याप्रमाणे, ही घटना ३ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजता घडली. महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत ब्लिंकिटच्या ऑफिशियल अकाऊंटला टॅग केले. आपल्या पोस्टमध्ये तिने डिलिव्हरी बॉयने तिच्यासोबत केलेल्या अश्लिल कृत्याची माहिती दिली आणि सीसीटीव्ही व्हिडीओ देखील शेअर केला.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होऊ लागली. नेटकरी यावर संताप व्यक्त करत आहेत. त्याने हे कृत्य जाणून बुजून केले होते की त्याच्याकडून चुकून झाले असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, डिलिव्हरी बॉय महिलेच्या घराबाहेर उभा आहे. तो आपल्या बॅगमधून पार्सल काढतो. महिला त्याला पैसे देते आणि तो डाव्या हातात पार्सलची बॅग धरून तिला देतो आणि उजव्या हाताने महिलेच्या छातीला स्पर्ध करतो. त्याचे हे कृत्य पाहून महिला मागे सरकते.

महिलेने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'ब्लिंकिटवरून ऑर्डर देताना आज माझ्यासोबत हे घडले. डिलिव्हरी बॉयने मला पुन्हा माझा पत्ता विचारला आणि नंतर मला अयोग्यरित्या स्पर्श केला. हे पूर्णपणे लज्जास्पद आहे. ब्लिंकिटने याविरुद्ध कठोर कारवाई करावी. भारतात महिलांची सुरक्षा हा विनोद बनला आहे का?' असा सवाल तिने या पोस्टमध्ये उपस्थित केला आहे. पोस्टमध्ये तिने पुढे असे देखील लिहिले की, त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मी पार्सलने माझी छाती झाकण्याचा प्रयत्न करते जेणे करून तो माझ्यासोबत पुन्हा असं करू नये. कृपया त्याच्याविरोधात कठोर कारवाई करा.

महिलेने पुढे हे देखील सांगितले की, ब्लिंकिटने या प्रकरणार कारवाई केली आहे. डिलिव्हरी बॉयचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले आणि त्याला प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक केले. महिलेच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत की, हे जाणूनबुजून घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. सुदैवाने कॅमेरा चालू होता. अन्यथा सिद्ध करणे कठीण झाले असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोक्यावर रॉडने वार, गळाही चिरला, भींतीवर रक्ताचे थारोळे; मदरशातील शिक्षकाला बायकोनेच संपवलं

Seeds: 'या' बियामध्ये आहे नॉनव्हेजपेक्षाही भरभरुन प्रोटीन, शरीरासाठी ठरेल सूपरफूड

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; आता पैसे हवे असतील तर...; सरकारचा नवा नियम काय?

Maharashtra Live News Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

Ramdas Kadam Vs Anil Parab: हा भा#$@...; रामदास कदमांची अनिल परब यांच्यावर आगपाखड|VIDEO

SCROLL FOR NEXT