Shocking: १० महिन्यातच संसाराचा भयंकर शेवट! नवऱ्यावर बायकोने केला लैंगिक शोषणाचे आरोप

Shocking: १० महिन्यातच संसाराचा भयंकर शेवट! नवऱ्यावर बायकोने केला लैंगिक शोषणाचे आरोप

Karnataka Crime News: कर्नाटकातील एका महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली की तिचा पती तिचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ मित्रांना पाठवत तिला ब्लॅकमेल करत होता, नाहीतर ते लीक होईल असे धमकी देत होता.
Published on

कर्नाटकातील पुट्टेनहल्ली येथे एक धक्कादायक प्रकरण घडले आहे. तिथे एका पतीने आपल्या पत्नीला त्याच्या मित्रांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपानुसार, आरोपी पतीने आपल्या पत्नीच्या बेडरूममध्ये कॅमेरे बसवून तिचे प्रायव्हेट क्षण रेकॉर्ड केले आणि नंतर त्या व्हिडिओ आणि फोटोंचा वापर करून तिला ब्लॅकमेल केले. धमकी देऊन त्याने तिला परदेशात राहणाऱ्या त्याच्या मित्रांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले.

पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचे सय्यद इनामुल हक नावाच्या व्यक्तीसोबत १ सप्टेंबर २०२४ रोजी लग्न ठरले होते. १५ डिसेंबर २०२४ रोजी मुस्लिम पद्धतीनुसार विवाह झाला. हुंड्याच्या स्वरूपात वरपक्षाला ३४० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक Yamahaची मोटरसायकल देण्यात आली. लग्नानंतर काहीच दिवसांनी इनामुलने तिला सांगितले की त्याचे आधीच एक लग्न झाले आहे आणि त्याचे १९ इतर महिलांशीही संबंध आहेत. ही गोष्ट ऐकून पीडित स्त्री हादरून गेली.

Shocking: १० महिन्यातच संसाराचा भयंकर शेवट! नवऱ्यावर बायकोने केला लैंगिक शोषणाचे आरोप
Shocking: भयानक घटना! सिनेमात काम देण्याचं आमिष, १५ वर्षाच्या मुलीला ड्रग्ज दिले, १८ महिने बलात्कार

इनामुल हकने लग्नानंतर आपल्या पत्नीचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ तिच्या नकळत रेकॉर्ड केले आणि ते परदेशात असलेल्या त्याच्या ओळखीच्या लोकांकडे पाठवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिच्यावर दबाव आणला की ती त्याच्या परदेशी मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवावा. तिने नकार दिल्यावर तो व्हिडिओ सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी देत होता. महिलेनुसार, तिच्या पतीने बेडरूममध्ये एक कॅमेरा बसवला होता, जो प्रायव्हेट क्षण रेकॉर्ड करत होता.

Shocking: १० महिन्यातच संसाराचा भयंकर शेवट! नवऱ्यावर बायकोने केला लैंगिक शोषणाचे आरोप
Shocking: धक्कादायक! ३० जणांनी घरात घुसून गोळीबार केला, पोलिसांनी तिघांना अटक केली

या सर्व प्रवृत्तींमध्ये तिने तिच्यावर झालेला मानसिक आणि शारीरिक छळ असल्याचे पोलिसांना सांगितले. इनामुल हकने तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिला तिच्या पालकांशी भेटू दिले नाही. तो सतत तिच्यावर लक्ष ठेवत असे आणि तिला कुठेही एकटी जाऊ न देता तिच्यासोबत ड्रायव्हर पाठवत असे. याशिवाय, त्याने तिच्या घरीही जाऊन तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप तिने केला आहे.

Shocking: १० महिन्यातच संसाराचा भयंकर शेवट! नवऱ्यावर बायकोने केला लैंगिक शोषणाचे आरोप
Crime News: महिला शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार, जिम ट्रेनरसह चार मित्रांचं भयानक कृत्य

महिलेने तिच्या सासरच्या मंडळींवरही छळाचे गंभीर आरोप लावले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, तिच्या मेहुण्याने सार्वजनिक ठिकाणी तिचा अपमान केला आणि दुसऱ्या एका नातलगाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणाबाबत तिने जेव्हा पतीकडे तक्रार केली तेव्हा त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सध्या आरोपी पती फरार असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हे संपूर्ण प्रकरण परिसरात तीव्र संताप निर्माण करणारे ठरले असून पोलिस लवकरच आरोपीला अटक करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com