बेंगळुरूमध्ये रेल्वे स्टेशनवरच १९ वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर बेंगळुरूमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरूणी बिहारची असल्याचे समजतेय. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचं समजतेय. पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूमधील केआर पुरम रेल्वे स्टेशनजवळ दोन नराधमांनी १९ वर्षीय महिलेवर बलात्कार केला. ही घटना बुधवारी मध्यरात्री १.३० वाजता घडल्याचे समोर आलेय. पीडिता केरळमध्ये काम करत होती, ती बिहारला परतत होती. त्यावेळी रेल्वे स्टेशनवर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. नागरिकांचा संताप पाहाता पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी पथक कामाला लागलेय.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय पीडिता केरळमधील कट्टप्पन शहरात काम करत होती. नोकरी आवडत नसल्यामुळे ती घरी परत निघाली होती. तिने मंगलुरूसाठी तिकीट खरेदी केले होते. पण त्याच तिकिटावर ती बेंगळुरूला पोहोचली. येथील केआर पुरम रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी पीडिताने चुलत भावाला फोन केला. पीडिता बुधवारी रात्री साधारण १:१३ वाजता केआर पुरम रेल्वे स्टेशनवर पोहोचली.
पीडितेच्या भावाने सांगितले की, ती महादेवपुराकडे जेवण घेण्यासाठी चालत निघाली होती. त्यावेळी दोन अज्ञात पुरुषांनी तिला छेडले. त्यानंतर एका निर्जन भागात ओढून लैंगिक अत्याचार केले. पीडितेने मदतीसाठी आरडाओरड केला, त्यावेळी रस्त्यावरून जाणारे लोक घटनास्थळी धावले. लोकांना पाहिल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
स्थानिकांनी पोलिसांशी त्वरित संपर्क केला. पोलीस तात्काळ घटनास्थळी धावले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत शोध सुरू केला. पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे बेंगळुरूमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.