Jalna Police : गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन; दोन डंपरसह पाच जण ताब्यात

Jalna News : नदी पात्रातून वाळूचा उपसा करण्यास बंदी. असे असले तरी रात्रीच्या वेळी वाळू तस्करी सुरु असते. तस्करी रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेकदा कारवाई केली जात असते. मात्र पथकावर हल्ला करण्याच्या घटना घडल्या
Jalna Police
Jalna PoliceSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: वाळूची अवैध तस्करी हि डोकेदुखी ठरत आहे. अनेक कारवाया होऊन देखील वाळू चोरी रोखली जात नाही. अशातच गोदावरी नदीमधून वाळूचे उत्खनन सुरु असताना पोलिसांनी याठिकाणी छापेमारी करत कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी नदीत असलेले दोन डंपरसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. 

नदी पात्रातून वाळूचा उपसा करण्यास बंदी आहे. असे असले तरी रात्रीच्या वेळी वाळू तस्करी जोरात सुरु असते. हि तस्करी रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेकदा कारवाई केली जात असते. मात्र बऱ्याचदा पथकावर हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे काही दिवस वाळू चोरी बंद राहते. मात्र काही दिवसांनी पुन्हा वाळूचे उत्खनन करण्यास सुरवात केली जात असते. अशाच प्रकारे जालन्यात गोदावरी नदीमध्ये वाळू तस्करी सुरु होती. 

Jalna Police
Mokhada News : गोणीत बांधलेल्या स्थितीत आढळला तरुणीचा मृतदेह; हत्या करून फेकल्याचा संशय, पोलिसांकडून तपास सुरु

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई 

जालन्यातील सिद्धेश्वर फाटा येथील गोदावरी नदीपात्रात काही नागरिक वाळूचे अवैधरित्या उत्खनन करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याठिकाणी वाहतूक करणारे दोन ट्रॅकरसह पाच संशयित आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहेत. जालन्यातील गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

Jalna Police
Lightning Strike : रात्री आजोबांसोबत शेतात गेला; वीज कोसळून नातवाचा मृत्यू, आजोबा गंभीर जखमी

२१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

गोंदी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुध्ये दोन डंपरचा समावेश आहे. तसेच पाच संशयित आरोपींना जेरबंद केले आहे. तर एक संशयित आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरु असून याचा तपास करण्यात येत आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com