Uttar Pradesh Crime  Saam Tv
देश विदेश

Shocking: नवीन गर्लफ्रेंडसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य, आधीच्या गर्लफ्रेंडचा गळा दाबला अन्...

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये व्हॅलेंटाईन वीकमध्ये एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसोबत भयंकर कृत्य केले. नवीन गर्लफ्रेंड मिळाल्यामुळे या तरुणाने आपल्या आधीच्या गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या केली.

Priya More

Summary -

  • आग्र्यात व्हॅलेंटाईन वीकमध्ये भयंकर हत्याकांड

  • नवीन गर्लफ्रेंडसाठी आधीच्या गर्लफ्रेंडची गळा दाबून हत्या

  • आरोपीने कुटुंबीयांच्या मदतीने मृतदेहाची लावली विल्हेवाट

  • अवघ्या २४ तासांत पोलिसांनी आरोपीला केली अटक

उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये भयंकर घटना घडली. व्हॅलेंटाईन वीकमध्ये एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसोबत भयंकर कृत्य केले. नवीन गर्लफ्रेंडसोबच व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी तरुणाने आधीच्या गर्लफ्रेंडची हत्या केली. तरुणाने गर्लफ्रेंडची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह महामार्गाजवळ फेकून दिला. या तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वेवर एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना तरुणीच्या बॉयफ्रेंडनेच तिची हत्या केल्याचे उघड झाले. हत्या झालेल्या तरुणीच्या बॉयफ्रेंडने कुटुंबीयांच्या मदतीने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. या तरुणाने भाड्याने कार घेतली आणि त्यामध्ये तिचा मृतेदह टाकून यमुना एक्स्प्रेस वेजवळ नेऊन फेकला.

हत्या झालेल्या तरुणीचे नाव सोनाली होते. सोनालीला तिच्या नवऱ्याचा विश्वासघात करून बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्याची किंमत मोजावी लागली. सोनालीचे लग्न हैवतपुरा येथील बाबूशी झाले होते. पानवाडी येथे मामाच्या घरी राहत असताना सोनाली शेजारी राहणाऱ्या सनीच्या प्रेमात पडली. लग्नानंतरही तो सोनालीचा पाठलाग करत राहिला. तो तिच्या सासरच्या घरीही अनेक वेळा जात होता. सोनाली सनीच्या प्रेमात ऐवढी वेडी झाली की ती नवऱ्याला सोडून त्याच्यासोबत पळून गेली. ती सनीसोबत दिल्लीतील जहांगीरपुरी येथे राहत होती. याच सनीने नवीन गर्लफ्रेंड मिळाल्यानंतर सोनालीपासून आपली सुटका करण्यासाठी तिची हत्या केली.

पोलिसांनी आरोपी सनीला अटक केली. तो दिल्लीतील वेश्याव्यवसाय रॅकेटमध्ये सहभागी असल्याची धक्कादायक माहिती देखील तपासातून उघड झाली. पोलिसांनी सांगितले की, प्रेमापोटी सोनालीने तिचे घर सोडले होते. पण ती सनीवर खुश नव्हती. ती प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून सनीशी भांडत होती. सनी दुसऱ्या मुलीच्या प्रेमात वेडा झाला होता. सोनालीने याला विरोध केला. सनीला त्याच्या नवीन गर्लफ्रेंडसोबत व्हॅलेंटाईन साजरा करायचा होता. त्याने नवीन गर्लफ्रेंडला वचन दिले होते की तो व्हॅलेंटाईन डेला तिच्याशी लग्न करेल. त्याला सोनालीपासून दूर व्हायचे होते त्यामुळे त्याने तिची गळा दाबून हत्या केली.

हत्येनंतर त्याने कार भाड्याने घेतली. सोनालीचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला आणि कारमध्ये ठेवला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो निघाला होता. वाटेत तो मृतदेह नदीत किंवा नाल्यात फेकण्याचा विचार करत होता. पण त्याचे वडील प्रदीप आणि आईलाही या घटनेची माहिती होती. त्यांनी सनीलाल सोनालीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली. त्याने सोनालीचा मृतदेह सौराईजवळ फेकून दिला. त्याला वाटले होते की सोनालीच्या मृतदेहाची ओळख पटणार नाही आणि पोलिस त्याच्यापर्यंत पोहचणार नाही. पण अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शिवनेरी एसटी आता मराठवाडा, विदर्भातही धावणार

Government Scheme: लाडकीसाठी फडणवीस सरकारची खास योजना, तब्बल ३०० कोटींची तरतूद; मिळणार आता १० लाखांपर्यंत कर्ज, वाचा

Yoga Exercise For Glowing Skin: सकाळी फक्त १० मिनिटे योगा करा, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Jalna–Jalgaon Railway Project: जालना ते जळगाव धावणार रेल्वे; ५,८०४ कोटींचा निधी मंजूर, १७ नवीन स्थानके असणारा नवा रेल्वे मार्ग कसा असेल?

Housing Society : मोठी बातमी! सोसायट्यांना आता 'NA' टॅक्स भरावा लागणार नाही; थकबाकीही माफ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT