Bihar Crime Saam tv
देश विदेश

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

Bihar Crime: बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्याच्या मुलाचा पोलस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. त्याने पोलिस अधिकाऱ्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात जखमी झालेल्या पोलिसावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

Summary -

  • राजद नेत्याचा मुलगा पप्पू साहनी पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार

  • एएसआय विकास कुमार सिंग यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप

  • पप्पू साहनी हा एटीएम चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या होता

बिहारमधील मुझफ्फरपूर येथे राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्याच्या मुलाचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. त्याने पोलिस अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर पोलिस चकमकीमध्ये राजद नेत्याचा मुलगा पप्पू साहनी गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एटीएम चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या आणि हिस्ट्रीशीटर पप्पू साहनीने मंगळवारी सकाळी ११.३० वाजता मुझफ्फरपूरमधील मिथानपुरा पोलिस ठाण्याच्या बेला रोडवरील पी अँड टी वळणावर बेला औद्योगिक पोलिस ठाण्याचे एएसआय विकास कुमार सिंग यांना गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेच्या अर्ध्या तासानंतर पोलिस आणि पप्पू साहनीच्या टोळीमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये पप्पूच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या होत्या. एसकेएमसीएचमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर आता वडिलांनी पोलिसांवर हत्येचा आरोप केला आहे.

बेला रोडवरील आयडीबीआय एटीएमजवळ पप्पू दिसल्याची माहिती मिळताच एएसआय विकास कुमार आणि इन्स्पेक्टर अभिषेक कुमार दुचाकीवरून त्याठिकाणी पोहोचले होते. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पप्पूने पोलिसांवर ३ गोळ्या झाडल्या. यामधील एक गोळी एएसआय विकास यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला लागली. तरीही एएसआय आणि इन्स्पेक्टर यांनी त्याला पकडण्याचा पयत्न केला राहिले. त्यानंतर दुकानदारांनी पप्पूला पकडले.

पोलिस स्टेशनमध्ये पप्पूची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला मिठनपुरा परिसरात लपलेल्या त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी नेले. दरम्यान त्याने इन्स्पेक्टरचा गळा पकडून पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रत्युत्तरात त्याला गोळी लागली. सहा वर्षांपूर्वी बेला एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या एटीएम लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या पप्पू साहनी याच्या बालुघाट येथील घरी पोलिसांनी छापा टाकला तेव्हा ३३.४६ लाख रुपये रोख रक्कम, ८० ग्रॅमची सोन्याची साखळी आणि अंगठी जप्त करण्यात आली होती. पिस्तूल देखील जप्त करण्यात आले होते. जप्त केलेले पैसे एटीएम फसवणुकीद्वारे कमावल्याचा पोलिसांनी दावा केला होता.

पप्पू साहनी गेल्या तीन दिवसांपासून बेला परिसरात एटीएम लुटण्याचा प्रयत्न करत होता. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, १३ आणि १५ फेब्रुवारी रोजी त्याने बेला पोलिस ठाण्यातील वैशाली इन्स्टिट्यूटजवळ एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. दोन लोकांचे एटीएम कार्ड बदलण्यात आले आणि त्यांच्या खात्यातून ९६,००० रुपये बेकायदेशीरपणे काढण्यात आले. त्याने यापूर्वी मिथानपुरा येथे एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पप्पूला अटक करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा जनता दरबार सुरू

HPCL Jobs: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी; ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; वर्षाला पॅकेज ५० लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Nashik : नाशिक हादरले! पोलिस असल्याचे सांगत व्यापाऱ्याचे अपहरण, २५ लाखांची खंडणीची मागणी; छळादरम्यान दुर्दैवी मृत्यू

Amboli Recipe: घरच्या घरी मऊ आणि चविष्ट आंबोळी कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

Warning signs of serious diseases: ही ७ प्रकारची दुखणी अंगावर काढू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT