

मुंबईत एसीबीने मोठी कारवाई केली
२ पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले
वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकाचा यामध्ये समावेश
गुन्हा दाखल करण्यासाठी ३ लाखांची मागणी केली होती
मुंबईमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. दोन पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. या दोघांना एसीबीने ताब्यात घेतलं आहे. एक लाखांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आले. या घटनेमुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये आज एसीबीने मोठी कारवाई केली. कुरार पोलिस ठाण्याच्या २ पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीने ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी ३ लाखांची लाच मागितली होती. यामधील एक लाख रुपये फिर्यादीकडून घेत असताना त्यांना रंगहाथ पकडण्यात आले. त्यांनी यापूर्वीच दोघांनी फिर्यादीकडून दोन लाख रुपये घेतले होते.
याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव तावडे आणि पोलीस उपनिरीक्षक जुने यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. या दोघांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या दोन्ही पोलिसांवर आता नेमकी काय कारवाई होते ते पाहणे महत्वाचे ठरेल.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील एका पोलिस कर्मचाऱ्याचा १४ लाखांची लाच घेतानाचा व्हिडीओ समोर आला होता. संभाजीनगरच्या लेणी परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खनवर कारवाई करू नयेत यासाठी एका पोलिस निरिक्षकाने आपल्या रायटरच्या माध्यमातून लाच घेतल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती १४ लाख रुपये मोजून घेत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती पोलिस कर्मचारी असल्याचा दावा केला जात आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात लाच घेतली जात असल्यामुळे संभाजीनगर पोलिस दलात खळबळ उडाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.