'तुला लय मस्ती आलीय!', पोलिस पाटलावर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉड डोक्यात घातला नंतर...

Police Patil Attacked During Election Duty In Maharashtra: निवडणूक मतमोजणीच्या दिवशी कर्तव्य बजावत असताना पोलीस पाटील यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला.
Police Patil Attacked During Election Duty In Maharashtra
Police Patil Attacked During Election Duty In MaharashtraSaam Tv
Published On

भरत नागणे, साम टीव्ही

पंढरपूर: माढा तालुक्यातील गार अकोले गावचे पोलीस पाटील मारुती शिंदे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या भीषण हल्ल्यामध्ये पोलीस पाटील मारुती शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी रोहित शिवाजी केचे याच्यासह इतर सहा जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police Patil Attacked During Election Duty In Maharashtra
श्रद्धेच्या भूमीत काळा धंदा; शिर्डीतील हॉटेलमधील देहविक्री प्रकरणाने खळबळ, नेमकं काय घडलं?

पोलीस पाटील मारुती शिंदे हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मतमोजणीच्या दिवशी गावामध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच काम करत असताना आरोपी रोहित केचे आणि त्याच्या इतर साथीदारांनी पोलीस पाटील मारुती शिंदे यांना 'तुला लय मस्ती आली आहे, 'तू गावात राहायचे नाही लगेच गाव सोडून जायचे, अशी धमकी देत लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये मारुती शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून राजकीय वैमानास्यातून हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Police Patil Attacked During Election Duty In Maharashtra
Uddhav Thackeray Faction Vs Bjp : उद्धव ठाकरे गटातील महिलांच्या रुद्रावतारापुढे भाजप नेता नरमला, दिले 'हे' आश्वासन

या घटनेला पाच दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपी मोकाट आहेत. आरोपीला खुद्द पोलिसच पाठीशी घालत असल्याचा आरोप पोलीस पाटील मारुती शिंदे यांनी केला आहे. विशेष म्हणजे रोहित केचे कुख्यात गुंड असून त्याच्यावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये सुमारे 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. कर्तव्य बजावत असताना एका पोलीस पाटलावरच प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान आरोपीला पोलीस पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपी पोलीस पाटील मारुती शिंदे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com