Vastu Tips for Fridge: फ्रीजमध्ये उष्टं आणि शिळं अन्न ठेवणं योग्य? वाचा वास्तुशास्त्रात काय नियम सांगण्यात आलेत

Refrigerator Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार फ्रिजमध्ये काही वस्तू ठेवणं अशुभ मानलं जातं. शिळं अन्न, औषधं आणि इंजेक्शन फ्रिजमध्ये ठेवावीत का? फ्रिजचा वरचा भाग कसा असावा? घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी फ्रिजशी संबंधित महत्त्वाचे वास्तु नियम जाणून घ्या.
Vastu Tips for Fridge
Vastu Tips for Fridgesaam
Published On: 

आजच्या काळात फ्रिज ही प्रत्येक घरातील गरजेची वस्तू बनली आहे. दूध, भाज्या, फळं, शिल्लक राहिलेलं जेवण अशा अनेक गोष्टी ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. घरातील महत्त्वाच्या इलेक्ट्रिक वस्तूंपैकी फ्रिज एक आहे. पण वास्तुशास्त्रानुसार घरात फ्रिज ठेवतानाही काही नियम पाळणं गरजेचं आहे.

फ्रिज कोणत्या दिशेला ठेवावा, त्याचा रंग कसा असावा आणि तो घराच्या रचनेनुसार कुठे ठेवावा, यालाही महत्त्व दिले जाते. फ्रिज घरात ठेवताना तो दिसायला चांगला असण्यासोबतच वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार असावा, असं सांगितलं जातं.

Vastu Tips for Fridge
Refrigerator Colour Vastu: घरात फ्रिज कोणत्या रंगाचा असावा? रंगानुसार घरात पडतो पैशांचा पाऊस; वास्तुशास्त्रात सांगितलेत नियम

वास्तु तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञांच्या मते, घरातील फ्रिजमध्ये कधीही उष्टं किंवा शिळं अन्न आणि औषधं ठेवू नयेत. असं केल्याने घरातील वास्तुदोष वाढू शकतात आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, असं वास्तुशास्त्रात सांगितलंय. यामुळे घरात वेगवेगळ्या अडचणी आणि समस्या येऊ शकतात.

फ्रिजमध्ये शिळं अन्न ठेवल्याने काय होतं?

अनेकदा घरात जेवण जास्त झाले की ते फ्रिजमध्ये ठेवलं जातं. पण वास्तुशास्त्रानुसार, फ्रिजमध्ये उष्टं किंवा जास्त दिवसांचं शिळं अन्न ठेवणं योग्य मानलं जात नाही. असे केल्याने अन्नपूर्णा देवी नाराज होते, अशी मान्यता आहे. यामुळे घरातील वास्तू बिघडू शकतं. अन्नपूर्णा देवी आणि वास्तुदेव नाराज झाल्यास घरात अन्नाची कमतरता निर्माण होऊ शकते, असं वास्तुशास्त्रात सांगितलंय.

फ्रिजमध्ये औषधे ठेवल्याने कोणत्या अडचणी येतात?

अनेक लोक फ्रिजमध्ये औषधं आणि इंजेक्शन ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार असं करणं योग्य मानलं जात नाही. फ्रिजमध्ये औषधं आणि इंजेक्शन ठेवल्याने घरात आजारपण वाढू शकतं, अशी मान्यता आहे. घरातील सदस्य वारंवार आजारी पडू शकतात. काही वेळा या समस्या दीर्घकाळ टिकू शकतात, असंही वास्तुशास्त्रात सांगितलंय.

Vastu Tips for Fridge
Vastu Tips: फ्रीज किचनमध्ये ठेवणं शुभ की अशुभ? नेमका कुठे ठेवावा? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

औषधे ठेवल्याने राहू-केतू नाराज होतात?

वास्तुशास्त्रानुसार, फ्रिजमध्ये औषधं आणि इंजेक्शन ठेवल्याने राहू आणि केतू हे ग्रह नाराज होतात, अशी मान्यता आहे. या दोन्ही ग्रहांचा वाईट प्रभाव पडल्यास घरात पैशांचा चुकीच्या कामांसाठी वापर होऊ शकतो. विनाकारण खर्च वाढू शकतो आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. या ग्रहांचा प्रभाव जास्त असल्यास घरात गरिबी येऊ शकते, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त सामान भरू नका

अनेक लोक फ्रिजचा वापर घरातील छोट्या स्टोअर रूमप्रमाणे करतात. गरजेच्या वस्तूंसोबतच नको असलेल्या वस्तूही फ्रिजमध्ये भरून ठेवल्या जातात. पण असं करणं योग्य नाही. फ्रिजमध्ये कधीही गरजेपेक्षा जास्त सामान ठेवू नये. फ्रिजमध्ये वस्तू कोंबून ठेवल्याने घरातील कर्ज वाढू शकते आणि विनाकारण खर्चही वाढू शकतो, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.

फ्रिजचा वरचा भाग नेहमी स्वच्छ ठेवा

फ्रिजच्या वरच्या भागावर अनेक जण डबे, बाटल्या, सामान आणि इतर वस्तू ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार फ्रिजचा वरचा भाग नेहमी स्वच्छ ठेवावा. खूप गरज असल्याशिवाय या भागावर कोणतीही वस्तू ठेवू नये. फ्रिजच्या वरच्या भागात शनीचा वास असतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे हा भाग अस्वच्छ किंवा सामानाने भरलेला ठेवू नये. असे केल्यास शनी नाराज होऊ शकतात, असे सांगितले जाते.

Vastu Tips for Fridge
Washing Machine Vastu: घरात वॉशिंग मशीन कुठे ठेवताय? योग्य दिशा माहिती नाही? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.