Ram Mandir Satellite View Hinusthan Times
देश विदेश

Ram Mandir: अवकाशातून कसं दिसतं राम मंदिर? पाहा, इस्त्रोनं शेअर केली छायाचित्रं

Ram Mandir Satellite View: इस्रोने उपग्रहातून घेतलेली राम मंदिराची छायाचित्रे शेअर केली आहेत. यात राम मंदिर स्पष्टपणे दिसतंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ISRO Shared Satellite Images Of Ram Temple

अवकाशातून राम मंदिर कसं दिसतं, असं तुम्हाला पण वाटतं का? नुकतेच इस्रोने अवकाशातून घेतलेले राम मंदिराचे काही छायाचित्रं शेअर केली आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरू आहे. अयोध्येतील मंदिरं फुलांनी सजवण्यात आली आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) मंदिराशी संबंधित काही छायाचित्रे शेअर केली आहेत. (Latest Marathi News)

अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाला फक्त एक दिवस उरलाय. इस्रोने आपल्या स्वदेशी उपग्रहांच्या मदतीने अंतराळातून राम मंदिराची छायाचित्रे घेतली. इस्रोने उपग्रहातून घेतलेली छायाचित्रे शेअर केली आहेत. ज्यामध्ये निर्माणाधीन राम मंदिर स्पष्टपणे दिसत आहे. ही छायाचित्रे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घेण्यात आली होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इस्रोने उपग्रहाद्वारे घेतलेले राम मंदिराची छायाचित्रं

रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटवरून घेतलेल्या या छायाचित्रात अयोध्येतील 2.7 एकरमध्ये पसरलेली रामजन्मभूमी दिसतेय. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचे हे चित्र इस्रोने गेल्या वर्षी 16 डिसेंबरला काढले होते. मात्र, त्यानंतर अयोध्येत दाट धुक्यामुळे इतर छायाचित्रं काढणं कठीण झाले होते.

इस्रोने काढलेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये दशरथ महल आणि शरयू नदी स्पष्टपणे दिसत आहे. अयोध्येचे रेल्वे स्थानकही दिसत आहे. सध्या भारताच्या अंतराळात 50 हून अधिक उपग्रह आहेत, त्यापैकी काहींचे रिझोल्यूशन एक मीटरपेक्षा कमी आहे. हैदराबाद येथील भारतीय अंतराळ संस्थेच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमधून ही छायाचित्रे क्लिक करण्यात आली आहेत.

गर्भगृहात मूर्तीची स्थापना

सोमवारी राम मंदिराच्या भव्य उद्घाटनाची अपेक्षा आणि सार्वजनिक उत्कंठा शिगेला पोहोचली असताना, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने अंतराळ उपग्रहातून दिसणार्‍या राम मंदिराची झलक दिली.

राम मंदिराच्या उभारणीच्या अनेक टप्प्यांमध्येही इस्रोच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रामाची मूर्ती बसवण्यासाठी नेमकी जागा निवडण्याचे मोठं आव्हान होतं. परंतु ट्रस्टची इच्छा होती की, ही मूर्ती जिथे प्रभू रामाचा जन्म झाला. त्या ठिकाणी गर्भगृहाच्या आत 3X6 फूट जागेत ठेवावी. इस्रोचे तंत्रज्ञान डिफरेंशियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम आधारित समन्वय वापरण्यात आले आहेत. ज्यासाठी 1-3 सेंटीमीटरपर्यंतचे अचूक समन्वय तयार केले गेले. ज्यामुळे मंदिराच्या गर्भगृहात मूर्तीच्या स्थापनेचा आधार तयार झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

SCROLL FOR NEXT