Supreme Court
Supreme Court saam Tv

Ayodhya Ram Mandir: मोठी बातमी! राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी राहुल नार्वेकरांच्या निकालावर सुनावणी होणार

Suprme court News: या सोहळ्यानिमित्त देशातील शासकीय बंद राहणार आहेत. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालावर सुनावणी होणार आहे.
Published on

प्रमोद जगताप, नवी दिल्ली

Ayodhya ram mandir inauguration:

देशात अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्यामुळे राममय वातावरण झालं आहे. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर सोहळ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. या सोहळ्यानिमित्त देशातील केंद्रीय कार्यालये बंद राहणार आहेत. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालावर सुनावणी होणार आहे. (Latest Marathi News)

देशात राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काही भागात मटण, चिकन, मासे विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. तसेच या दिवशी शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुटी असणार आहे. तर राज्यातील कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुटी मिळणार आहे. मात्र, या दिवशी सुप्रीम कोर्ट सुरू असणार असल्याची माहिती समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Supreme Court
Noida Crime News: 100 एकर जमीन, वर्चस्वाची लढाई आणि ५ हत्या; एअरलाइन्सच्या क्रू मेंबरच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

सुप्रीम कोर्टाला सोमवारी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी कुठलीही सुटी नाही. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बार असोसिएशनने कोर्टाला पत्र लिहित सुटी जाहीर करा, अशी विनंती केली होती. मात्र, २२ जानेवारला सुप्रीम कोर्ट दिवसभर सुरु राहणार आहे.

Supreme Court
Ram Mandir Invitation: राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण देताना कोणती अट ठेवण्यात आली होती? समोर आली महत्वाची माहिती

राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी सुप्रीम कोर्ट सुरु राहणार आहे. तसेच या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून अध्यक्षांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. कोर्ट क्रमांक १ मध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशांसमोर ही सुनावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com