Rajkot Gaming Zone Fire News:  Saamtv
देश विदेश

TRP Game Zone Fire: सुट्टीचा दिवस, ९९ रुपयाची खास ऑफर अन् २७ जणांचा होरपळून मृत्यू; गेम झोनमधील मृत्यू तांडवाची विदारक कहाणी!

Rajkot Gaming Zone Fire News: या गेमिंग झोनला अग्निशमन विभागाकडून एनओसीही मिळाली नसल्याचे समोर आले आहे. NOC साठी कधीही अर्ज केला होताकी नाही याबाबतची अधिकृत माहिती अग्निशमन विभागाकडूनच येणार आहे.

Gangappa Pujari

गुजरात, ता. २६ मे २०२४

गुजरातच्या राजकोटमध्ये टीआरपी गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागून २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये ९ चिमुकल्यांचाही समावेश आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घटनेवर शोक व्यक्त केला. सुट्टीचा दिवस, ९९ रुपयांची खास ऑफर आणि भयंकर अन्नितांडवामागची थरकाप उडवणारी कहाणी आता समोर आली आहे.

शनिवारी राजकोटमधील एका टीआरपी गेमिंग झोनमध्ये आग लागून २७ जणांचा मृत्यू झाला. सुट्टीचा वार असल्याने अनेक नागरिक या गेमिंग झोनमध्ये उपस्थित होते. त्याचदिवशी ९९ रुपयांची खास ऑफरही ठेवण्यात आली होती. त्यामुळे पालक, मुलांनी मोठी गर्दी केली होती. अशातच आगीची दुर्घटना घडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

प्राथमिक तपासात ही आग शॉर्ट सक्रिटमुळे लागल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेम झोनमधून बाहेर पडण्यासाठी आणि प्रवेश करण्यासाठी 6 ते 7 फुटांचा एकच मार्ग होता. त्यामुळे आग लागल्यानंतर नागरिकांचा एकच गोंधळ उडाला, ज्यामुळे बाहेर पडण्याच्या मार्गावर मोठी गर्दी होऊन अनेकांना मार्ग सापडणे कठीण झाले.

टीआरपी गेम झोनमध्ये 1500 ते 2000 लिटर डिझेल जनरेटर आणि गो कार रेसिंगसाठी 1000 ते 1500 लिटर पेट्रोल साठले होते. सुदैवाने ही आग पेट्रोल-डिझेलच्या बॅचपर्यंत पोहोचली नाही, अन्यथा मृतांचा आकडा आणखी वाढू शकला असता. दरम्यान, या गेमिंग झोनला अग्निशमन विभागाकडून एनओसीही मिळाली नसल्याचे समोर आले आहे. NOC साठी कधीही अर्ज केला होताकी नाही याबाबतची अधिकृत माहिती अग्निशमन विभागाकडूनच येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

SCROLL FOR NEXT