Dharashiv Wedding News: बैलाच्या वाढदिवसाचा मुहूर्त, लग्नपत्रिकेऐवजी पुस्तिका अन् अनोखी मिरवणूक; शेतकरी पुत्राच्या लग्नाचा थाटचं न्यारा!
Dharashiv Unique Wedding Story News: Saamtv

Dharashiv Wedding News: बैलाच्या वाढदिवसाचा मुहूर्त, लग्नपत्रिकेऐवजी पुस्तिका अन् अनोखी मिरवणूक; शेतकरी पुत्राच्या लग्नाचा थाटचं न्यारा!

Dharashiv Unique Wedding Story News: सोहळ्याच्या लग्नपत्रिकेऐवजी २४ पानांची लग्नपुस्तिका छापली. त्यात समाजप्रबोधनात्मक विविध महापुरुषांच्या कार्याविषयी लेख लिहण्यात आले आहेत.
Published on

बालाजी सुरवसे, धाराशिव|ता. २६ मे २०२४

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. आपलं लग्न अगदी दणक्यात, थाटामाटात व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. सोशल मीडियावर अनेक हटके लग्नसोहळ्यांची चर्चाही पाहायला मिळते. सध्या धाराशिवमधील एका शेतकरी पुत्राच्या अनोख्या शिवविवाह सोहळ्याची संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे. काय आहे नेमकी या हटके, अनोख्या विवाह सोहळ्याची कल्पना; जाणून घ्या सविस्तर.

शाहु, फुले आंबेडकरांचा वैचारिक वारसा लाभलेला पुरोगामी महाराष्ट्र हा अनेक गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या अन् कष्टकऱ्यांच्या चळवळींसाठी ओळखला जातो. या महापुरुषांनी दिलेला विचाराचा वारसा अनेक चळवळी करत आहेत. अशाच एका हटके आणि पुरोगामी महाराष्ट्राला अभिप्रेत असणाऱ्या विवाह सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

धाराशिवच्या मुरूममध्ये मराठा सेवा संघात कार्यरत असणारे सावंत कुटुंबियांनी पंचांग, मुहूर्तासह विविध बाबींना फाटा देत शिवधर्म पद्धतीचा शिवविवाह सोहळा पार पाडला. या लग्नात पंचांग, मुहूर्त आधी बाबांना फाटा देत अनोखा विचार मांडण्यात आला. या सोहळ्याच्या लग्नपत्रिकेऐवजी २४ पानांची लग्नपुस्तिका छापली. त्यात समाजप्रबोधनात्मक विविध महापुरुषांच्या कार्याविषयी लेख लिहण्यात आले आहेत.

Dharashiv Wedding News: बैलाच्या वाढदिवसाचा मुहूर्त, लग्नपत्रिकेऐवजी पुस्तिका अन् अनोखी मिरवणूक; शेतकरी पुत्राच्या लग्नाचा थाटचं न्यारा!
Pune Essay Competition: माझा बाप बिल्डर असता तर? पुण्यात भव्य निबंध स्पर्धा, विषय, ठिकाण अन् नियम सर्वच हटके; अनोख्या निषेधाची राज्यात चर्चा

एकीकडे शेतकरी मुलांचे लग्न होत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांप्रती आदर असणाऱ्या शेतकरी नवरदेव मुलाने घरच्या बैलाच्या वाढदिवसादिवशी लग्नाचा बार उडवून दिला. या लग्न सोहळ्यासाठी नवरदेव आणि नवरीला वाजतगाजत बैलगाडीतून मिरवणूक काढून मंडपात आणण्यात आले. लग्न लागण्या अगोदर बैलाचा केक कापून वाढदिवस ही साजरा करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्याची सध्या जिल्हाभर चर्चा सुरु आहे.

Dharashiv Wedding News: बैलाच्या वाढदिवसाचा मुहूर्त, लग्नपत्रिकेऐवजी पुस्तिका अन् अनोखी मिरवणूक; शेतकरी पुत्राच्या लग्नाचा थाटचं न्यारा!
Maharashtra Politics: संजय राऊतांच्या 'रोखठोक' आरोपानंतर राजकीय वातावरण तापलं; भाजप नेत्यांची आक्रमक भूमिका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com