सुरज मसुरकर, साम टीव्ही मुंबई
उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज सामनाच्या रोखठोकमध्ये खळबळजनक दावा केला आहे. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं दिसत आहे. संजय राऊत यांनी नागपुरात नितीन गडकरींचा पराभव होण्यासाठी पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे.
संजय राऊत यांच्या गंभीर आरोपानंतर आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांनी रोखठोकमधून आकलेचे तारे तोडले, अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. संजय राऊत यांनी २०१९ मध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही येऊ द्या, असं बावनकुळे म्हणाले आहेत. भाजप हा पक्ष नाही तर एक कुटुंब आहे. आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलेल्या संजय राऊतांना परिवार काय कळणार? अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या एकाच परिवारातील सदस्य असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं आहे. संजय राऊत उद्धव ठाकरेंचे कर्मचारी (Sanjay Raut Saamana Rokhthok Article)आहेत, पण ते शरद पवारांची चाकरी करतात. भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केल्यामुळे संजय राऊतांवर त्यांनी टीका केली आहे. भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत, असा टोलाही बावनकुळेंनी लगावला आहे.
भाजप आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) देखील संजय राऊतांच्या आरोपांवर आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांची दुटप्पी भूमिका असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. देशाच्या भविष्यासाठी पंतप्रधान मोदींची गरज आहे. त्यामुळे योगी मोदी असं चित्र आहेत, असं दरेकर म्हटले आहेत. आमचा पक्ष आणि देश मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल, असं दरेकर म्हणाले आहेत .
गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे मूर्खपणाचा कळस असल्याची टीका दरेकरांनी संजय राऊतांवर केली आहे. प्रसिद्धीत राहण्यासाठी नौटंकी करण्याचा प्रयत्न असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. सामन्याच्या दाव्याला काडीमात्र किंमत देत नसल्याचं दरेकरांनी सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) विजयासाठी योगदान दिल्याचं नागपूरवासियांना माहीत आहे, असं म्हणत दरेकरांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.