Sanjay Raut on Raj Thackeray : राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर...; संजय राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut criticizes Raj Thackeray News : 'राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर पक्षातील कार्यकर्त्याला चांगले दिवस आले असते, असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर...; संजय राऊत स्पष्ट बोलले
Sanjay Raut : Saam tv
Published On

मयूर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी बिनशर्त भाजप पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी महायुतीसाठी सभा देखील घेतल्या होत्या. राज ठाकरेंच्या भूमिकेवरून मतदानादरम्यान संजय राऊतांनी टोला लगावला आहे. 'राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर पक्षातील कार्यकर्त्याला चांगले दिवस आले असते, असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

राज्यात पाचव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. 'एका बाजूला मुडदे पडले असताना कार्यवाहक पंतप्रधान रोड शो करतात, अशी टीका राऊत यांनी केली. 'राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षासाठी अधिक मेहनत घेतली असती, त्यांच्या स्वत:च्या पक्षातील कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते. त्यांचा भाडेतत्वावर घेतलेला पक्ष आहे'.

राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर...; संजय राऊत स्पष्ट बोलले
Eknath Shinde: श्रीकांत शिंदे हॅट्रिक करणार, रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होणार; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

राऊत पुढे म्हणाले, 'आज पाचवा टप्पा सुरु आहे. आज देशात 94 ठिकाणी मतदान सुरू आहे. देशात प्रचंड पैसा सापडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बॅगा चेक केल्या. त्यांनी पैसे पुढे पाठवले. मुख्यमंत्र्यांचे फक्त कपडे दाखवले. कपड्यांच्या लिलाव करून किती मिळणार माहीत नाही'.

ईशान्य मुंबईतील लोकसभा मतदारसंघातील गोंधळावर भाष्य करताना राऊत म्हणाले, 'निवडणूक आयोगाची अशी कुठलीही नियमावली नाही. मतदारांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात ते डमी मशीन होतं. येथील काही लोक भाजपचे लोक आहेत. त्यांनी दादागिरी केली. त्यानंतर आमच्या शिवसैनिकांना अटक केली. आम्ही पैसे वाटप करणाऱ्यांची तक्रार केली तर त्यांना अटक झाली नाही. ज्यांनी तक्रार केली, त्यांनाच अटक केली. पोलीस पक्षपातीपणा करत आहेत.

राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर...; संजय राऊत स्पष्ट बोलले
Breaking News: ईशान्य मुंबईत मोठा गोंधळ, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; शिवसैनिक आक्रमक

'4 जूनला त्यांना कळेल की तुमचं दडपशाही झुगारून आम्ही जिंकू. बेकायदेशीरपणे पैसे वाटप करणाऱ्यांना संरक्षण द्यायला, फडणवीस हे मुलुंडला येतात. त्यांनी कारस्थान उघड करणाऱ्या शिवसैनिकांना अटकेचे आदेश दिले. मतदार आणि जनता तुमच्याबरोबर नाही', असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com