Gujarat Fire Accident: राजकोट गेमिंग झोन दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; PM मोदी हळहळले, पोस्ट करत व्यक्त केलं दु:ख

Game Zone Fire Accident Latest Update: गुजरातच्या गेम झोन आग प्रकरणी मोठी अपडेट आता समोर येत आहे. या आगीत एकूण २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
गेम झोन आग प्रकरण
Gujarat Fire AccidentSaam Tv

गुजरातच्या राजकोटमध्ये टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागल्याची घटना २५ मे रोजी घडली होती. याप्रकरणी मोठी अपडेट आता समोर येत आहे. या आगीत आगीपर्यंत २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआयच्या हवाल्यानुसार मिळत आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही मृतदेहांचा शोध सुरू आहे. आग एवढी भीषण होती की, मृतदेह पूर्णपणे जळून राख झाले आहेत. याप्रकरणी गेम झोनचा मालक आणि व्यवस्थापक यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी X अकाउंटवर पोस्ट करत या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजकोटमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेने अत्यंत व्यथित झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत. त्यांच्यासोबत माझे विचार आहे. जखमींसाठी प्रार्थना देखील पीएम मोदींनी केली आहे. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे.

टीआरपी गेम झोनला शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आग लागली होती. मृतदेह पूर्णपणे जळाल्यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण झालं आहे. आतापर्यंत २७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, हा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. आग लागली, त्यावेळी गेमिंग झोनमध्ये मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असल्याची माहिती मिळत (Game Zone Fire Accident) आहे.

गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील कलावद येथील गेमिंग झोनमध्ये ही दुर्घटना घडली आहे. विकेंड असल्यामुळे अनेक कुटुंबे आपल्या मुलांसह गेम झोनमध्ये गेली होती. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल (Gujarat Fire Accident) आणि पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी पोहोचून त्यांनी बचावकार्य सुरू केलं होतं. पोलिसांनी गेमिंग झोनच्या मालकास अटक केलीय.

गेम झोन आग प्रकरण
Delhi Fire Accident : दिल्लीत बेबी केअर सेंटला भीषण आग, ६ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू, भयानक VIDEO

गेमिंग झोनमध्ये अचानक आग लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. ही आग इतकी भीषण होती, तिचे पाच किलोमीटर अंतरापर्यंत धुराचे लोट दिसत होते. घटनास्थळी आज सकाळपर्यंत मदतकार्य सुरूच (Rajkot Game Zone Fire) होते. आता आग विझवण्यात आली असून ढिगाऱ्यांमध्ये शोधमोहीम सुरू आहे. राजकोटमधील सर्व गेमिंग झोनच्या ऑपरेशनवर बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

गेम झोन आग प्रकरण
Fire in game zone : गुजरातच्या राजकोटमध्ये मॉलच्या गेमिंग झोनला भीषण आग, २४ जणांचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com