Delhi Fire Accident : दिल्लीत बेबी केअर सेंटला भीषण आग, ६ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू, भयानक VIDEO

Delhi Baby Care Hospital Fire : दिल्लीतील बेबी केअर सेंटरला शनिवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत ६ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. तर १२ बालकांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.
दिल्लीत बेबी केअर सेंटला भीषण आग, ६ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू, भयानक VIDEO
Delhi Baby Care Hospital FireANI Twitter

राजधानी दिल्लीतील विवेक विहार परिसरात असलेल्या एका बेबी केअर सेंटरला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण सेंटरला विळखा घातला. या आगीत ६ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक बालकं जखमी झाली.

दिल्लीत बेबी केअर सेंटला भीषण आग, ६ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू, भयानक VIDEO
Nashik News : सराफा व्यापाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड; पैशांचा नुसता ढीग, नोटा मोजण्यासाठी लागला १४ तासांचा वेळ

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी हजर झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आतापर्यंत १२ बालकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. यापैकी ५ बालकांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनेही याबाबत वृत्त दिले आहे. एनएनआयच्या वृत्तानुसार, दिल्लीतील विहार परिसरात एक बेबी केअर सेंटर आहे. या सेंटरमध्ये अनेक बालकांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बेबी केअर सेंटरला अचानक आग लागली.

आग लागल्याचं कळताच कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केली. क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण बेबी केअर सेंटर आगीच्या विळख्यात सापडलं. कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर धाव घेतली. मात्र, या आगीत ६ नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

जवानांनी जीवाची बाजी लावून १२ नवजात बालकांना बाहेर काढलं. यातील ५ बालके गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीनंतर रुग्णालयातील डॉक्टर तसेच कर्मचारी पळून गेले आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. बालकांचा होरपळून मृत्यू झाला.

दिल्लीत बेबी केअर सेंटला भीषण आग, ६ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू, भयानक VIDEO
Cyclone Remal : अतिभयंकर 'रेमल' चक्रीवादळ आज धडकणार, तुफान पाऊस कोसळणार; अनेक भागांना अलर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com