Rajasthan Plane Crash Saam Tv
देश विदेश

Rajasthan Plane Crash: राजस्थानमध्ये लढाऊ विमान कोसळलं, पायलटचा मृत्यू; पाहा अपघाताचा थरारक VIDEO

Rajasthan News: राजस्थानमध्ये मोठी घटना घडली. वायूदलाचे लढाऊ विमान राजस्थानमध्ये कोसळलं. या विमानाचे तुकडे तुकडे झाले. अपघातामध्ये पायलटचा जागीच मृत्यू झाला.

Priya More

राजस्थानच्या चुरूमध्ये वायूदलाचे लढाऊ विमान कोसळले. रतनगढच्या भानुदा गावामध्ये हे विमान कोसळलं. विमान दुर्घटनेमध्ये पायलटचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळाच राजलदेसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान भारतीय वायूदलाचे असल्याचे सांगितले जात आहे. विमान कोसळल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे झाले. गावानजीकच्या शेतामध्ये हे विमान कोसळलं. विमानाच्या तुकड्यांजवळच पालयचा मृतदेह आढळून आला. पायलटच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या अपघाताचा तपास सुरू केला आहे.

विमान कोसळताना मोठा आवाज झाला अशी स्थानिकांनी माहिती दिली. सध्या घटनास्थळावर मोठी गर्दी झाली आहे. विमान कोसळल्यानंतर आग लागली त्यामुळे घटनास्थळावर धुराचे लोट पसरले आहेत. विमान अपघाताची बातमी सगळीकडे पसरताच रतनगडमध्ये एकच खळबळ उडाली.

जिल्हाधिकारी अभिषेक सुराणा आणि स्थानिक पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. लष्कराचे बचाव पथकही घटनास्थळी पोहचले आहे. जेणेकरून घटनास्थळ सील करता येईल आणि तपास सुरू करता येईल. गावकऱ्यांनी सांगितले की, विमान अपघातानंतर लगेचच शेतात आग लागली. ही आग गावकऱ्यांनी स्वतःहून विझवण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुम्ही अर्बन नक्षलसारखं वागाल तर अटक होईल; CM फडणवीसांचं राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर | VIDEO

Crop Insurance: पिकांना संरक्षण देणाऱ्या योजनेला शेतकऱ्यांची नापसंती; ७ लाख लोकांनी पीक विम्याकडे का फिरवली पाठ?

Maharashtra Live News Update : नांदेड जिल्ह्यातील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर

Uddhav Thackeray : योग्य व्यक्तीला योग्य खातं मिळालं; उद्धव ठाकरे यांचा माणिकराव कोकाटेंना टोला

भाजपविरोधात भूमिका घेतली, नेत्याची थेट पक्षातूनच हकालपट्टी, ६ वर्षांसाठी निलंबित

SCROLL FOR NEXT