Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद अपघातात आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला? गुजरात सरकारने केली अधिकृत आकडेवारी जाहीर|VIDEO

Dreamliner Accident: १२ जून रोजी अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेत २७५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

12 जून रोजी अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या बोइंग ड्रीमलायनर विमानाच्या झालेल्या अपघातात 275 लोकांचा मृत्यू झाल्याची महिती गुजरात सरकारने दिली आहे. या विमानात असलेले 241 प्रवासी आणि जमिनीवरील 34 लोकांचा समावेश आहे. गुजरातच्या आरोग्य विभागाने आज पहिल्यांदाच अधिकृतपणे ही आकडेवारी जाहीर केली आहे. 12 जून रोजी लंडनला जाणारे हे विमान कोसळल्यापासून एकूण मृतांच्या संख्येबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. डीएनए चाचणीनंतरच हा आकडा सांगता येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये 260 मृतदेहांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटली आहे, तर सहा मृतदेहांची चेहऱ्यावरून ओळख पटली आहे. मृतांमध्ये 120 पुरुष, 124 महिला आणि 16 मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत 256 मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले आहेत, तर बाकीच्या मृतदेहांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com