Bogus Cotton Seeds : ६ लाखांचे कापसाचे बोगस बियाणे जप्त; महाराष्ट्र- गुजरात सीमेवर मोठी कारवाई

Nandurbar News : खरीप हंगामाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असते. कृषी विभागाचे पथक कार्यरत असून अशा बोगस बियाणांची विक्री करण्यावर कारवाई केली जात आहे
Bogus Cotton Seeds
Bogus Cotton SeedsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : खरीप हंगाम सुरु झाला असून यासाठी कापसाच्या बियाणाची खरेदी केली जात आहे. मात्र प्रतिबंधित असलेल्या कापूस बियाण्याची मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने विक्री केली जात आहे. अशाच प्रकारे एका खाजगी वाहनातून एचटीबीटी कापूस बियाण्याची वाहतूक केली जात असताना कृषी विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. यात तब्बल सहा लाख रुपयांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहे. 

खरीप हंगामाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असते. यासाठी कृषी विभागाचे पथक कार्यरत असून अशा बोगस बियाणांची विक्री करण्यावर कारवाई केली जात आहे. तरी देखील गुजरातमधून छुप्या पद्धतीने बोगस बियाणे आणले जात आहे. दरम्यान अक्कलकुवा शहरातून अवैद्य एचडीबीटी कापूस बियाण्याची वाहतूक होत असल्याची माहिती अक्कलकुवा तालुका कृषी विभागाचा पथकाला मिळाली होती. 

Bogus Cotton Seeds
Bhiwandi Fire : भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू, २० गोदाम जाळून खाक

१११ पाकिटे जप्त 

महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवरती खाजगी वाहनातून एचडीबीडी कापूस बियाण्यांची वाहतूक केली जात होती. त्यानुसार पथकाने सापडा रचून एका खाजगी वाहनातून तपासणी करत त्या ठिकाणी प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणांचा साठा आढळून आला. तब्बल सहा लाख रुपये किमतीचा १११ पाकिटे बोगस कापूस मिळण्याची जप्त करण्यात कृषी विभागाला यश आला आहे.

Bogus Cotton Seeds
Beed Rain : जूनमध्येच बीड जिल्ह्यातील ११ प्रकल्प ओवरफ्लो; १३ दिवसात ३८ मिलिमीटर पाऊस

दोन जणांवर गुन्हा दाखल 

अक्कलकुवा शहरात कृषी विभागाचा पथकाने सापळा रचून वाहनातून अवैद्य एचडी बीपी कापूस बियाण्यांसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वैद्यरित्या प्रतिबंधित असलेल्या बोगस बियाण्यांची वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात विरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com