Crime: ९० वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार, तोंडात कापड टाकलं अन्...; विहिरीत फेकण्याचा प्रयत्न

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशमध्ये ९० वर्षांच्या वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. चार आरोपींनी घरात घुसून महिलेसोबत हे भयंकर कृत्य केले. त्यानंतर तिची हत्या करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
Crime: ९० वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार, तोंडात कापड टाकलं अन्...;  विहिरीत फेकण्याचा प्रयत्न
Madhya Pradesh Crime Saam Tv
Published On

Summary -

  • ९० वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार

  • मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील धक्कादायक घटना

  • चार आरोपींनी घरात घुसून महिलेसोबत केलं भयंकर कृत्य

  • आरोपींनी महिलेला विहिरीत फेकण्याचाही प्रयत्न केला

९० वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक समोर आली. मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील पुनासामध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली. चार जणांनी घरामध्ये एकट्या राहणाऱ्या ९० वर्षीय महिलेवर हल्ला केला. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तोंडात कापड कोंबून आरोपींनी महिलेसोबत हे भयंकर कृत्य केले. ऐवढ्यावर न थांबता त्यांनी तिला विहिरीत फेकण्याचा प्रयत्न केला. महिलेची प्रकृती गंभीर असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित वयोवृद्ध महिला शेतामध्ये बांधलेल्या घरामध्ये राहते. या घरामध्ये ती एकटीच राहते. गुरूवारी रात्री जेवण केल्यानंतर महिला घरामध्ये झोपली होती. त्यावेळी चार जण घरामध्ये घुसले. आरोपींनी आधी आरडाओरडा करू नये म्हणून महिलेच्या तोंडात कापड कोंबले. त्यानंतर आरोपींनी महिलेचे हातपाय पकडून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. महिलेला गंभीर जखमी झाल्या. तिचे गुप्तांग फाटले आणि प्रचंड रक्तस्राव होऊ लागला. १२ तास महिला रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत राहिली. या घटनेनंतर आरोपींनी महिलेला विहिरीमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला. शेतामध्ये काही जणांचा आवाज ऐकून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

Crime: ९० वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार, तोंडात कापड टाकलं अन्...;  विहिरीत फेकण्याचा प्रयत्न
Crime: जत्रेत अपरहण करून सामूहिक बलात्कार, गुंगीचे औषध देत १६ वर्षीय मुलीच्या शरीराचे लचके तोडले

आरोपी महिलेला शेतामध्येच गंभीर अवस्थेत टाकून फरार झाले. सकाळी शेतामध्ये कामासाठी आलेल्या काही महिलांनी वृद्ध महिलेचा आवाज ऐकला. त्यांनी पाहिले तर वृद्ध महिला खाटेवर गंभीर अवस्थेत पडली होती. त्यांनी तात्काळ महिलेच्या मुलीला आणि पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती गंभीर आहे. तिच्या गुप्तांगाला अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत. पुढील उपचारासाठी तिला खंडावा जिल्ह्यात हलवण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला.

Crime: ९० वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार, तोंडात कापड टाकलं अन्...;  विहिरीत फेकण्याचा प्रयत्न
Pune Crime: 'तू खूप सुंदर दिसतेस...', आधी अंगाला स्पर्श केला नंतर...; डिलिव्हरी बॉयचं तरुणीसोबत भयंकर कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com