Rajasthan Accident Saam Tv
देश विदेश

Accident: मुंबई- दिल्ली महामार्गावर अपघाताचा थरार, भाविकांच्या कारला ट्रकची जोरदार धडक; ४ जणांचा जागीच मृत्यू

Rajasthan Accident: महाकालेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन परत येत असताना भाविकांवर काळाने घाला घातला. राजस्थानमध्ये कार आणि ट्रकचा भयंकर अपघात झाला. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर ट्रकने कारला धडक दिली

  • या अपघातामध्ये चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला

  • अपघातामध्ये मृत्यू झालेले महाकालेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन परत येत होते

  • अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्ण चुराडा झाला

राजस्थानमध्ये भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर झाला. अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेले महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्याठिकाणावरून परत येत असताना मंगळवारी सकाळी अपघाताची ही घटना घडली. भरधाव ट्रकने कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या पापडा पोलिस स्टेशन परिसरातील पिलर क्रमांक १९३ जवळ हा भीषण अपघात झाला. सकाळी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवरून एक कार जात होती. अचानक मागून वेगाने येणाऱ्या एका भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रकने कारला अनेक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. अपघातामध्ये कारचा चुराडा झाला. या अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला आणि रस्त्याने जाणाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

कारमधून ५ जण प्रवास करत होते. हे सर्वजण महाकालेश्वरच्या दर्शनासाठी गेले होते. या अपघातामध्ये चार जणांनी जागीच प्राण सोडले तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना तातडीने बाहेर काढले आणि दौसा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतदेहांची ओळख पटवणे देखील कठीण झाले आहे.

अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिस या ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसंच, जवळच्या साक्षीदारांचे जबाब आणि एक्सप्रेसवेवर बसवलेल्या कॅमेऱ्यांचा वापर करून तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात अतिवेग, निष्काळजीपणा आणि कदाचित धुके किंवा कमी दृश्यमानता यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

SCROLL FOR NEXT