गोगावलेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांना आत्मसमर्पण, तुरुंगात जावं लागणार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Vikas Gogawale Bail Rejected Police Surrender News: महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणात मोठी कारवाई. विकास गोगावले यांचा जामीन फेटाळल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आरोपींनी पोलिसांना आत्मसमर्पण केले आहे.

महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या राडा प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोपींनीही महाड तालुका पोलीस ठाण्यात स्वतःला समर्पण केले आहे.

विकास गोगावले यांच्यासह शिवसेनेच्या सात जणांनी सकाळी महाड शहर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली होती. त्यानंतर सुमारे पाच तासांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोपींनीही पोलीस ठाण्यात हजर होत आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे.

महाड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण होऊन राडा झाला होता. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. अटक टाळण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com