Surabhi Jayashree Jagdish
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर हे बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
भगवान शिवांच्या या रूपाला ‘महाकाल’ असं म्हटलं जातं, जे काळावरही नियंत्रण ठेवतात.
दरवर्षी लाखो श्रद्धाळू या मंदिरात दर्शनासाठी येतात.
मध्य प्रदेशात सर्वाधिक धार्मिक पर्यटक याच ठिकाणी येतात.
या मंदिराची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे ‘भस्म आरती’, जी दररोज पहाटे चार वाजता होते.
लोकांचा असा विश्वास आहे की, याठिकाणी केवळ दर्शन केल्यानेच पापांचा नाश होतो.
महाकाल लोक कॉरिडॉर तयार झाल्यानंतर येणाऱ्या भक्तांची संख्या आणखी वाढली आहे.
हे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाही आहे.