Boat Accident: मोठी बातमी! ३५० प्रवाशांना घेऊन जाणारं जहाज समुद्रात बुडालं; १५ जणांचा मृत्यू, २८ बेपत्ता

Philippines Boat Drowned : दक्षिण फिलीपिन्समध्ये ३५० जणांना घेऊन जाणारी एक प्रवासी फेरी समुद्रात बुडाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. यात १५ जणांचा मृत्यू झालाय तर २८ जण बेपत्ता झालेत.
Philippines Boat Drowned :
Rescue teams search for missing passengers after a ferry carrying over 350 people sank in southern Philippines.saam v
Published On
Summary
  • दक्षिण फिलिपाईन्समध्ये मोठी समुद्री दुर्घटना

  • 350 प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी समुद्रात बुडाली

  • 15 जणांचा मृत्यू, 28 जण अजूनही बेपत्ता

फिलिपाईन्सच्या दक्षिण भागात मोठी दुर्घटना घडली आहे. ३५० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली. ही दुर्घटना सोमवारी पहाटे घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २८ जण बेपत्ता आहेत. 'एएफपी' (AFP) या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार बचाव पथकाने किमान ३०१ प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात आलंय.

Philippines Boat Drowned :
Shocking: १५० जणांना घेऊन जाणारी प्रवासी बोट समुद्रात बुडाली, ७० जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

हाती आलेल्या माहितीनुसार, अपघाग्रस्त बोट एक 'इंटर-आयलंड कार्गो आणि पॅसेंजर फेरी' होती. ही बोट झांबोआंगा या बंदर शहरातून सुलू प्रांतातील जोलो बेटाकडे जात होती. त्यादरम्यान बोटीचा अपघात झाला. या बोटीत ३३२ प्रवासी आणि २७ क्रू मेंबर्स (कर्मचारी) होते. मध्यरात्रीनंतर बोटीमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, त्यानंतर बोट बुडू लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोस्ट गार्डच्या माहितीनुसार,प्रवासाला निघाल्यानंतर साधारण ४ तासांनी स्थानिक वेळेनुसार सोमवारच्या दरम्यान पहाटे १:५० वाजता जहाजाने संकटाचा सिग्नल पाठवला होता. कोस्ट गार्ड कमांडर रोमेल दुआ यांनी एएफपीला दिलेल्या माहितीनुसार, बालुक द्वीप गावापासून साधारण २ किलोमीटर अंतरावर ही बोट बुडाली. समुद्रात बुडणाऱ्या ३१६ लोकांना रेस्क्यू करून बेटावर पोहोचवण्यात आले. यातील १५ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली असून २८ जण अजूनही बेपत्ता आहेत.

Philippines Boat Drowned :
Rajasthan: राजस्थानमधून १० हजार किलो स्फोटकं जप्त, प्रजासत्ताक दिनादरम्यान काय प्लान होता? तपास सुरू

दुआ बचाव कार्यासाठी कोस्ट गार्डचे एक विमानही पाठवण्यात आले होते. तसेच नौदल आणि वायुसेनेने मदतीसाठी आपली पथके रवाना केली. बसिलनचे गव्हर्नर मुजीब हाटामन यांनी मिंडानाओच्या इसाबेला पोर्टवरील घटनास्थळाचे व्हिडिओ क्लिप्स फेसबुकवर शेअर केलेत. यामध्ये वाचवलेल्या लोकांना बोटीतून बाहेर काढले जात असल्याचे दिसत असून, काही प्रवाशांना स्ट्रेचरवरून नेले जात असल्याचं दिसत आहे.

दरम्यान बोट नेमकी का बुडाली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे दुआ यांनी सांगितलं. बंदरातून निघण्यापूर्वी कोस्ट गार्डने या बोटीला परवानगी दिली होती आणि ओव्हरलोडिंगचे कोणतेही संकेत नव्हते, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com