Rajasthan: राजस्थानमधून १० हजार किलो स्फोटकं जप्त, प्रजासत्ताक दिनादरम्यान काय प्लान होता? तपास सुरू
Rajasthan 10000 Kg Explosives SeizedSaam Tv

Rajasthan: राजस्थानमधून १० हजार किलो स्फोटकं जप्त, प्रजासत्ताक दिनादरम्यान काय प्लान होता? तपास सुरू

Rajasthan 10000 Kg Explosives Seized: राजस्थान पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी तब्बल १० हजार किलो स्फोटकं जप्त केली. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.
Published on

Summary -

  • नागौर जिल्ह्यात फार्महाऊसमधून 10 हजार किलो स्फोटकं जप्त

  • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसांची मोठी कारवाई

  • सुलेमान खान या आरोपीला अटक

  • आंतरराज्यीय नेटवर्कचा संशय

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राजस्थानमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. नागौरी जिल्ह्यातील थांवला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका फार्म हाऊसमधून तब्बल १० हजार किलो स्फोटकं जप्त करण्यात आली. अमोनियम नाइट्रेटसह एका व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सुलेमान खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या स्फोटकाद्वारे कुठे हल्ला करण्याचे षडयंत्र रचले जात होते याचा तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरसौर गावात पोलिसांच्या जिल्हा विशेष पथकाने आणि नागौरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही अनैध स्फोटकं जप्त केली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. अटक करण्यात आलेला आरोपी सुलेमान खान या आधी देखील अशीच कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात तीन गुन्हा आधीच दाखल करण्यात आले आहेत. आता या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली असून पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

Rajasthan: राजस्थानमधून १० हजार किलो स्फोटकं जप्त, प्रजासत्ताक दिनादरम्यान काय प्लान होता? तपास सुरू
Rajasthan Video: शेम-शेम; शाळेच्या स्टाफ रूममध्ये मास्तर-मास्तरीणचे नको ते चाळे, व्हिडिओ व्हायरल

या प्रकरणात सुलेमान खानला अटक करण्यात आली. त्याने आपल्या फार्म हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं लपवून ठेवली होती. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी त्यांना १८७ कट्ट्यामध्ये जवळपास १०,००० किलोग्राम अमोनियम नाइट्रेट आणि डेटोनेटर ही स्फोटक सामग्री सापडली. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, तो कथितरित्या वैध आणि अवैध कामांमध्ये कार्यरत असलेल्या लोकांना स्फोटकांचा पुरवठा करत होता.

Rajasthan: राजस्थानमधून १० हजार किलो स्फोटकं जप्त, प्रजासत्ताक दिनादरम्यान काय प्लान होता? तपास सुरू
Rajasthan Plane Crash: राजस्थानमध्ये लढाऊ विमान कोसळलं, पायलटचा मृत्यू; पाहा अपघाताचा थरारक VIDEO

जिल्हा पोलिस अधीक्षक मृदुल कच्छवा यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत आरोपीने हे स्फोटकं बेकायदेशीर खाणकामात सहभागी असलेल्या लोकांना विकल्याची कबुली दिली. या नेटवर्कचे इतर राज्यांशी संबंध आहेत का याचाही पोलिस तपास करत आहेत. जर आढळले तर केंद्रीय एजन्सी पुढील कारवाई करतील. आरोपीवर आधीच ३ गुन्हे दाखल आहेत. यापैकी २ गुन्हे थानवाला आणि चौपासनी (अलवर) येथील न्यायालयात प्रलंबित आहेत. तर एका प्रकरणात पडुकाळा पोलिस ठाण्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Rajasthan: राजस्थानमधून १० हजार किलो स्फोटकं जप्त, प्रजासत्ताक दिनादरम्यान काय प्लान होता? तपास सुरू
Rajasthan: प्रार्थना सुरू असताना शाळेचं छत कोसळलं, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com