Rajasthan Video: शेम-शेम; शाळेच्या स्टाफ रूममध्ये मास्तर-मास्तरीणचे नको ते चाळे, व्हिडिओ व्हायरल

Rajasthan Teacher Video Viral: राजस्थानच्या चित्तौडगडमधील एका शाळेतील मास्तर मास्तरीणचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्टाफ रूममध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने दोन शिक्षक आणि शिक्षिकेला अनुचित कृत्य करताना पकडलं.
 Teacher Video Viral
Rajasthan Teacher Video ViralSaam Tv
Published On

राजस्थानच्या चितौडगडमधील एका शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मास्तर आणि मास्तरीण एकमेकांना मिठ्ठी मारताना दिसत आहेत. इंटरनेटवर शाळेच्या स्टाफ रुममध्ये बसलेल्या शिक्षक आणि शिक्षिकेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात हे दोन्ही शिक्षक अश्लील चाळे करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षिका एकमेकांना चुंबन घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ न्युज४ ने आपल्या एक्सच्या अकाउंटवर शेअर करण्यात आलाय.

व्हिडिओमधील दोन्ही शिक्षिकांची ओळख पटलीय. हे दोन शिक्षक राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यातील सालेरा तालुक्यात असलेल्या अजोलिया खेडा ग्रामपंचायतमधील गंगरार ब्लॉक येथील सरकारी शाळेत कार्यरत आहेत. हे दोन्ही शिक्षक वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात नोकरी करत असल्याची माहिती मिळालीय.

शिक्षक राजस्थानमधील या शाळेतील लेव्हल 2 सामाजिक शास्त्राचा शिक्षक आहे. ही बाब उघडकीस येताच सरकारी शाळेतील दोन शिक्षकांच्या वर्तनावर स्थानिक नागरिक आणि इंटरनेट युझर संतापले. शिक्षकांच्या अश्लील कृत्यावर ग्रामस्थ संताप व्यक्त केलाय. शैक्षणिक जागेची नैतिकता टिकली पाहिजे. शाळेसारख्या पावित्र ठिकाणी असे कृत्य केल्याने दोन्ही शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी केली जात आहे.

 Teacher Video Viral
Viral Video: तरुणींचा भररस्त्यात जोरदार राडा! जमिनीवर पाडून पार लाथा-बुक्क्यांनी मारलं;पाहणाऱ्यांची उडाली भंबेरी

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वेगवेगळ्या दिवसांचे दृश्य रेकॉर्ड झाले आहे. यात दोन शिक्षक सरकारी शाळेत त्यांच्या ड्युटीच्या वेळेत अनेक वेळा अश्लील कृत्य करत असल्याचे दिसून आले आहे. या अश्लील कृत्याचा संपूर्ण व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. शिक्षक व्यास सोफ्यावर बसलेल्या महिला शिक्षिकेच्या जवळ जातात.

 Teacher Video Viral
Shocking Video: दुकानदाराला अचानक आला हृदयविकाराचा झटका, खुर्चीवरच कोसळला, नेमकं काय घडलं, पाहा व्हिडीओ

त्यानंतर एकमेकांना मिठी मारतात आणि चुंबन घेत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. डिसेंबर 2024 चा टाईम स्टॅम्प असलेल्या दुसऱ्या क्लिपमध्ये, तो शिक्षक महिला शिक्षिकेजवळ जातात आणि तिच्या डेस्कवर तिचे चुंबन घेतात. त्यानंतरच्या व्हिज्युअलमध्ये ते दोघेही अयोग्य वर्तन करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com