Shocking: १५० जणांना घेऊन जाणारी प्रवासी बोट समुद्रात बुडाली, ७० जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

Passenger Boat Capsizes: १५० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये ७० जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Shocking: १५० जणांना घेऊन जाणारी प्रवासी बोट समुद्रात बुडाली, ७० जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
Passenger Boat CapsizesSaam Tv
Published On

Summary -

  • पश्चिम आफ्रिकेत १५० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली.

  • आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झालेत.

  • फक्त १६ जणांना वाचवण्यात यश आले.

  • बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पश्चिम अफ्रिकेमधून मोठी बातमी समोर आली आहे. १५० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी बोट समुद्रात बुडाली. या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गाम्बियाच्या विदेश मंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा या अपघाताची माहिती देत ७० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ही दुर्घटना गेल्या अनेक वर्षांमधील सर्वात मोठी दुर्घटना असल्याचे सांगितले जात आहे.

न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही बोट गाम्बियावरून निघाली होती. यामध्ये गाम्बिया आणि सेनेगल या ठिकाणचे नागरिक होते. बुधवारी ही बोट मॉरिटानिया समुद्र किनाऱ्यानजीक बुडाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बोटीमध्ये १५० पेक्षा जास्त जण प्रवास करत होते. यामधील फक्त १६ जणांना जिवंत वाचवण्यात आले आहे.

Shocking: १५० जणांना घेऊन जाणारी प्रवासी बोट समुद्रात बुडाली, ७० जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
Boat Ambulance : दीड कोटींची बोट ॲम्बुलन्स बुडाली; सरदार सरोवरातील घटना, आरोग्य सेवांवर परिणाम

मॉरिटानियाई प्रशासनाने बुधवार आणि गुरूवारी या दोन दिवसांत ७० जणांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढले. प्रत्यक्षदर्शीने दावा केला आहे की, मृतांचा आकडा १०० पेक्षा जास्त असू शकतो. ही बोट ज्या मार्गावरून जात होती हा मार्ग जगातील सर्वात खतरनाक मार्ग असल्याचे सांगितले जाते. हा मार्ग अटलांटिक रूट पश्चिम अफ्रिकाच्या स्पेनच्या कैनरी द्वीपांपर्यंत जातो. हजारो नागरिक या मार्गानेच युरोपला जाण्याचा प्रयत्न करतात.

Shocking: १५० जणांना घेऊन जाणारी प्रवासी बोट समुद्रात बुडाली, ७० जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
Raigad Boat Mishap Drown: रायगड समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाली, बचावकार्याचा थरारक व्हिडिओ समोर, पाहा...

युरोपीय संघाना दिलेल्या आकडेवारीनुसार, मागच्या वर्षी ४६ हजारांपेक्षा जास्त अवैध प्रवासी कैनरी द्वीपला आले होते. जो आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. यादरम्यान १० हजारांपेक्षा अधिक जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. २०२३ च्या तुलनेने हा आकडा ५८ टक्के जास्त आहे. अशामध्ये गाम्बियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना आवाहन केले आहे की ते असा खतरनाक प्रवास करू नये.

Shocking: १५० जणांना घेऊन जाणारी प्रवासी बोट समुद्रात बुडाली, ७० जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
Passenger Boat Accident: भाऊच्या धक्क्याकडे जाणऱ्या प्रवासी बोटीचा अपघात; नेव्हीच्या स्पीड बोटची धडक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com