Boat Ambulance : दीड कोटींची बोट ॲम्बुलन्स बुडाली; सरदार सरोवरातील घटना, आरोग्य सेवांवर परिणाम

Nandurbar News : नर्मदा खोऱ्यातील अनेक गावांमधील अत्यवस्थ रुग्णांसह गंभीर रुग्णांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी बोट ऍम्ब्युलन्स उपलब्ध करण्यात आली होती. यामुळे आरोग्य सेवा पुरविणे सोईचे झाले होते
Boat Ambulance
Boat AmbulanceSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: सरदार सरोवराच्या आजूबाजूच्या परिसरातील गावांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी बोट ऍम्ब्युलन्स घेण्यात आली होती. नंदुरबार जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाने अवघ्या वर्षभरापूर्वी सुमारे दीड ते पावणे दोन कोटी रुपये खर्चून घेतलेली हि बोट ॲम्बुलन्स बुडाली आहे. सरदार सरोवर धरण क्षेत्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने बोट बुडाली आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नंदुरबार जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून बोट ॲम्बुलन्स नर्मदा नदीच्या काठावरील दुर्गम गावांमध्ये आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी तैनात करण्यात आली होती. साधारण वर्षभरापासून या बोटीच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविण्यात येत होत्या. यासाठी हि बोट कायम नर्मदा नदीच्या काठावरच तैनात राहत असे. मात्र, पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने बोट ॲम्बुलन्सचा मागील सुमारे ३० टक्के भाग पाण्याखाली गेला.

Boat Ambulance
'मी थेट बावनकुळेंशी बोलेन'; फ्रेंडशीप पार्टीत २ गटात राडा, आयोजकानं पोलिसांना धमकावलं

बोट काढण्यासाठी वडोदरा येथून मागविली क्रेन 
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे आणि इतर अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बोट बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले आहे. बोट बाहेर काढण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असून यासाठी गुजरात प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला आहे. गुजरात राज्यातील वडोदरा येथून विशेष क्रेन मागवण्यात आली असून, तिच्या मदतीने बोट सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Boat Ambulance
Sambhajinagar Crime : गाडीच्या मदतीने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत समोर

आरोग्य सेवांवर परिणाम 
या घटनेमुळे परिसरातील आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बोट ॲम्बुलन्स बुडण्यामागचे नेमके कारण काय आणि ती सुरक्षित बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या प्रकारामुळे निश्चितच आरोग्य विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com