Passenger Boat Accident: भाऊच्या धक्क्याकडे जाणऱ्या प्रवासी बोटीचा अपघात; नेव्हीची स्पीड बोटची धडक

Navy Speed Boat Rams Passenger Vessel: मोरा-भाऊचा धक्का येथे १० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या "संत ज्ञानेश्वर" या बोटीचा अपघात झालाय. नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने हा अपघात घडलाय. कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु समुद्री वाहतुकीबाबत सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Navy speed boat collides with passenger launch “Sant Dnyaneshwar” carrying 10 passengers near Uran.
Navy speed boat collides with passenger launch “Sant Dnyaneshwar” carrying 10 passengers near Uran.saamtv
Published On
Summary
  • उरणजवळ प्रवासी बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीची धडक बसली.

  • संत ज्ञानेश्वर नावाच्या बोटीत १० प्रवासी प्रवास करत होते.

  • मोरा ते भाऊचा धक्का मार्गावर ही दुर्घटना घडली.

  • मोठा अनर्थ टळला, मात्र सागरी सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले.

उरणजवळच्या समुद्रात प्रवासी बोटीला पुन्हा नेव्हीच्या स्पीड बोटीने धडक दिल्याची घटना घडलीय. बोटीचा अपघात घडला तेव्हा प्रवासी बोटीतून १० जण प्रवास करत होते. मोरा ते भाऊचा धक्का या सागरी मार्गावर अनेक वर्षांपासून प्रवासी लॉन्च सेवा सुरूय. मोरा येथून शुक्रवारी रात्री ८ वाजता संत ज्ञानेश्वर ही प्रवासी बोट प्रवाशांना घेऊन मुंबईच्या भाऊच्या धक्क्याकडे जात होती. ही बोट मोरा बिकन आणि नेव्ही जेट्टीदरम्यान आली असताना ही दुर्घटना झाली. शुक्रवारी साडेआठच्या सुमारास नेव्हीच्या स्पीड बोटीने प्रवासी बोटीला धडक दिली.

दरम्यान स्पीड बोट प्रवासी बोटी केवळ घासली होती. जर ही धडक बोटीच्या मध्य भागावर झाली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. दरम्यान या दुर्घटनेत कोणत्याच प्रकारची जीवितहानी झाली नाहीये. या दुर्घटनेच्या वृत्ताला भाऊचा धक्का येथील बंदर अधिकारी सुशील सातेलकर यांनी दुजोरा दिलाय. मोरा येथून सुटणाऱ्या शेवटच्या लॉन्चला नेव्हीच्या जेट्टीजवळ नेव्हीच्या स्पीड बोटीने धडक दिली.

या प्रवासी बोटीत १० प्रवासी होते. यात कुणीही जखमी झाले नसले तरी बोटीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर प्रवाशांना घेऊन ही बोट भाऊच्या धक्क्यापर्यंत सुरक्षित आणण्यात आली आहे, असे बंदर अधिकारी म्हणालेत. दरम्यान डिसेंबर 2024 ला अशाच प्रकारे निलकमल बोटीला नेव्हीच्या स्पीडबोटीने धडक दिली होती. या दुर्घटने १४ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या आठ महिन्यांनंतर आता पुन्हा एकदा नेव्हीच्या बोटीने एका प्रवासी बोटीला धडक दिल्याची घटना घडलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com