

तामिळनाडूमध्ये रविवारी भीषण अपघात
त्रिची-मुदुरै राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
बसमधील ३ प्रवाशांचा मृत्यू
तामिळनाडूच्या मेलूरजवळ रविवारी भीषण अपघाताची घटना घडली. कोट्टूमपत्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील त्रिची-मुदुरै राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडलाय. रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला दुसऱ्या बसने जोरदार धडक दिली. या धडकेत बसमधील ३ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईहून बस मदुरै येथे निघाली होती. बस ही पल्लामती उपनगर भागातील रस्त्यावर एका चहाच्या दुकानात थांबवण्यात आली. त्यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या बसमध्ये कोणी नव्हतं. या बसला दुसऱ्या खासगी बसने जोरदार धडक दिली.
भरधाव बसमधील तिघांचा अपघातात मृत्यू झाला. अपघातातील दोघांची नावे समोर आली आहे. कनगरंजितम(६५) आणि सुदर्शन (२३) असे दोघांची नावे आहेत. एका महिलेची ओळख अद्याप झालेली नाही. या व्यक्तीरिक्त बसमधील १५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी तातडीने जखमींसाठी हेल्पलाइनवर कॉल करत रुग्णवाहिका बोलावून घेतली. त्यानंतर या रुग्णवाहिकेतून मेलूर आणि मदुरै येथील सरकारी रुग्णालयात त्यांना दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच मेलूर पोलीस आणि कोट्टमट्टी पोलीस स्टेशनचे पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या अपघाताची दखल घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
तत्पूर्वी, तामिळनाडूच्या उसिलपट्टीमध्ये काही दिवसांपूर्वी भीषण अपघातात झाला. या अपघातात नवरदेवाचा अपघाती मृत्यू झाला. लग्नाच्या पाच दिवस आधीच भीषण अपघात झाला. नवरदेवाच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रसन्ना वेंकटेश असे तरुणाचे नाव होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.