

अकोला महापालिकेत भाजपविरोधात विरोधक एकत्र
अकोल्यात ठाकरे गट, वंचित आणि शरद पवार गट किंगमेकरच्या भूमिकेत
महापौरपद ठाकरे गटाला, स्थायी समिती वंचितला मिळण्याचा प्रस्ताव
अक्षय गवळी, साम टीव्ही
अकोल्यातून मोठी बातमी. अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 'हाय व्होल्टेज पॉलिटिक्स' रंगतंये. आज रात्री होत आहे वंचित, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, एमआयएम, ठाकरेंची शिवसेना, भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आणि अपक्ष नगरसेवकांची डिनर डिप्लोमॅसी आणि बैठक. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, एमआयएमचे पदाधिकारी नगरसेवक, याशिवाय सर्वच नगरसेवकांची डिनर डिप्लोमॅसी आणि बैठक सुरुये. 30 पेक्षा जास्त नगरसेवक या बैठकीला उपस्थित आहे.
अकोला शहराबाहेरच्या सिटी स्पोर्टस क्लब येथे ही बैठक आणि डिनर डिप्लोमॅसी चालतंये.. अकोल्याचा राजकारणातील मोठी घडामोडी या ठिकाणी होत आहे. अकोल्यात भाजपला रोखण्यासाठी वंचित, एमआयएम, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थित होत आहे. एकंदरीत 21 नगरसेवक असलेली काँग्रेस म्हणते आम्हाला कुठलंच पद नक. भाजप विरोधात सर्वांनी एकत्र येत यावं, अशी काँग्रेसची भूमिका आहे.
अकोल्यात बहुमताच्या 41 आकड्याची भाजप आणि काँग्रेसकडून मोठी जुळवणी सुरू आहे. दरम्यान, 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत नाही. 38 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. दुसरीकडे काँग्रेसचे 21, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक आहे. सत्ता स्थापनेत महत्वाची आणि 'किंगमेकर'ची वंचित आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेची भूमिका आहे.
आजच्या बैठकीनंतर भाजप विरोधात सर्वच पक्ष एकत्र आल्यास महापालिकेचे 'महापौर पद ठाकरेंच्या शिवसेने'कडे, तर उपमहापौर पद शरद पवारांच्या राष्ट्रवादीला. स्थायी समिती सभापती पद वंचित बहुजन आघाडीला जाणार अशी सूत्रांनी माहिती दिलीय. तसेच उर्वरित सभापतीपद अपक्ष नगरसेवकांना जाण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही बैठकीत काय चर्चा होतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.
भाजप विरोधात एकत्र आल्यास असं असणार गणित
महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि इतर लहान पक्षांना एकत्र करून सत्ता खेचून आणण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे 21, ठाकरे गटाचे 6, शरद पवार गटाचे 3, वंचितचे 5 आणि एमआयएमचे 3 नगरसेवक एकत्र आल्यास हा आकडा 38 होतो. मात्र, आजच्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेविकाचा पती फयाज खान आणि भाजपचे बंडखोर नगरसेवक आशिष पवित्रकार तसेच प्रभाग 7 मधील अपक्ष नगरसेवकसोबत आल्यास 41 बहुतमाताचा आकडा गाठू शकतो.
एकूण जागा : 80
बहुमताचा आकडा : 41
भाजप : 38
काँग्रेस : 21
उबाठा : 06
शिंदे सेना : 01
अजित राष्ट्रवादी : 01
शरद राष्ट्रवादी : 03
वंचित : 05
एमआयएम : 03
अपक्ष : 02
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.