ठरलं! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचा महौपार; मुंबईचं काय?

महायुतीच्या गोटातून मोठी बातमी हाती आलीये. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचा महौपार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली.
Devendra Fadnavis and Eknath Shinde  news
Devendra Fadnavis and Eknath Shinde Saam Tv
Published On
Summary

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचा महापौर होणार असल्याचा दावा चव्हाण यांनी केलाय

मुख्यमंत्री फडणवीस दावौस दौऱ्यावरून आल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय

मुंबई महापालिकेच्या महापौरपदाबाबतचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात

महायुतीच्या गोटातून मोठी बातमी हाती आली आहे. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचा महापौर होणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. या महापालिकांच्या महापौरपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावौस दौऱ्यावरून आल्यानंतर होणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. परंतु मुंबई महापालिकेबाबत काय निर्णय घेणार, ही बाब गुलदस्त्यात आहे.

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाण्यात शिंदे गट इतर राजकीय पक्षाच्या मदतीने सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या तिन्ही महापालिकेत शिंदे गटाने पावले उचलल्याने भाजपचं टेन्शन वाढलं होतं. तिन्ही पालिकेत भाजप आणि शिंदेसेनेत तोडगा न निघाल्याने एकनाथ शिंदेंनी भाजपला वगळून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, भाजपने अचानक शिंदे गटासोबत सत्ता स्थापनेसाठी युती करण्यासाठी पाऊल पुढे टाकलं आहे. परंतु या युतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केले.

Devendra Fadnavis and Eknath Shinde  news
मुंबईत भाजपचीच सत्ता, ४० वर्षांनंतर मायानगरीवर राज्य करणार; महापौरपदासाठी कुणाची नावे आघाडीवर?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरून परतल्यावर मुंबईत एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्रित बैठक होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या तिन्ही महानगरपालिका मध्ये महायुतीचा महापौर होण्यासंदर्भात यापूर्वीच गेल्या आठवड्यात झालेल्या भेटीत सविस्तर चर्चा झाली आहे. तीनही महानगरपालिकेमध्ये महायुतीला जनादेश मिळाला आहे. त्यामुळे या जनादेशानुसारच तीनही महानगरपालिकेत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार आहे, अशी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती आहे.

Devendra Fadnavis and Eknath Shinde  news
'लेडी बॉस'च्या मृत्यूचं गूढ उलगडलं; कर्मचाऱ्यानेच पेट्रोलने टाकून जाळलं अन् रचला अपघाताचा बनाव, धक्कादायक कारण समोर

तत्पूर्वी, मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर होणार असल्याचंही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आहे. याचदरम्यान दुसरीकडे शिंदे गटाने मुंबईच्या महापौरपदावर दावा केला आहे. शिंदे गटाने अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. शिंदे गटाने मुंबईच्या महापौरपदासाठी मागणी केल्यानंतर ठाण्यातही भाजपने महापौरपदासाठी मागणी केली होती. त्यानंतर तिन्ही पालिकेच्या महापौरपदावर रविंद्र चव्हाण यांनी मोठं भाष्य केल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com