chennai news
chennai Saam tv

'लेडी बॉस'च्या मृत्यूचं गूढ उलगडलं; कर्मचाऱ्यानेच पेट्रोलने टाकून जाळलं अन् रचला अपघाताचा बनाव, धक्कादायक कारण समोर

chennai shocking news : चेन्नईतील 'लेडी बॉस'च्या मृत्यूचं गूढ उलगडलं आहे. कर्मचाऱ्यानेच बॉसला पेट्रोलने टाकून जाळलं आहे.
Published on
Summary

LIC ऑफिसमधून हादरवणारी घटना समोर

चेन्नईतील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या मृत्यूचं गूढ उलगडलं

कार्यालयातील कर्मचाऱ्यानेच महिला अधिकाऱ्याला संपवलं

'जिंगदी के साथ भी , जिंदगी के बाद भी', असा विश्वास LIC ग्राहकांना अनेक वर्ष देत आली आहे. याच LIC ऑफिसमधून हादरवणारी घटना समोर आली आहे. याच एलआयसीच्या कार्यालयातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या मृत्यूचं गूढ उलगडलं आहे. कामावरून वाद झाला, त्यानंतर कर्मचाऱ्याने रागाच्या भरात कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यालाच जीवंत जाळल्याची ही घटना आहे. ही घटना चेन्नईतील LIC ऑफिसमध्ये घडली.

नेमकं घडलं काय ?

गेल्या महिन्यात या ऑफिसमध्ये आग लागल्याची दुर्देवी घटना घडली. या भीषण आगीत 54 वर्षीय महिला कल्याणी नंबी यांचा होरपळून मृत्यू झाला. कल्याणी या ऑफिसमध्ये वरिष्ठ ब्राँच मॅनेजर होत्या. त्यांच्या कार्यालयात मृत्यू झालेल्या 40 जणांच्या क्लेम फाईल्स ऑफिसमध्ये रखडल्या होत्या. याबातची सतत तक्रार LIC ऑफिसमध्ये येत होती. त्यानंतर रखडलेल्या फाईल अद्याप मार्गी का लावल्या नाही? याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर कल्याणी यांनी ऑफिसमधील ४६ वर्षीय कर्मचारी डी रामवर भडकल्या.

chennai news
अकोल्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; भाजपच्या उमेदवाराला काँग्रेस आणि MIM चा पाठिंबा?

'मला हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अन्यथा मला वरिष्ठांना याबाबत सांगावं लागेल, अशा शब्दात कल्याण यांनी डी राम यांना सुनावलं होतं. त्यानंतर संतापलेल्या डी राम याने कल्याणी यांना संपवायचा कट रचला. डी रामने केबीनमध्ये पेट्रोलने टाकून कल्याणी यांना पेटवून दिलं. या आगीत कल्याणी यांचा होरपळून मृत्यू झाला. घटना अपघात वाटावी वाटण्यासाठी स्वत:लाही पेटवून घेतलं.

chennai news
सत्ता समीकरण बदलणार; भाजपची सत्तेसाठी ठाकरे गटाला 'ऑफर', पक्षप्रमुख काय निर्णय घेणार?

असा रचला बनाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही दुर्घटना वाटत होती. मात्र घटनेचा तपास पुढे जाऊ लागला, त्यानंतर हळूहळू पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या. पोलिसांनी कर्मचारी डी राम याची चौकशी केली. त्यावेळी चौकशीत सतत विधाने बदलत होता. तपास जसा पुढे गेला, तसा पोलीसांचा डी रामवरील संशय बळावत गेला. तपासादरम्यान डी रामच्या केबिनमध्ये पोलिसांना पेट्रोलने भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या सापडल्या. त्यामुळे डी रामनेच कल्याणी यांच्या हत्येचा कट रचल्याचं उघड झालं. यावेळी पोलिसांनी बाईकमधून पेट्रोल काढणारा पाईप आणि इतर साहित्य जप्त केलं. डी रामने 17 डिसेंबरच्या रात्री झालेला कल्याणी यांची हत्या केली.

chennai news
मुंबईत भाजपचीच सत्ता, ४० वर्षांनंतर मायानगरीवर राज्य करणार; महापौरपदासाठी कुणाची नावे आघाडीवर?

डी रामने गुन्हा कबूल करताना सांगितलं की, मृत्यू झालेल्यांच्या 40 क्लेम फाईल प्रलंबित होत्या. त्यामुळे नोकरी धोक्यात आली होती. त्यामुळे कल्याणी यांना जीवे मारण्याचं ठरवलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com