

आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मुंबई महत्वाचं शहर
मुंबईवर महायुतीचं वर्चस्व
मुंबईच्या महापौर निवडीकडे सर्वांचं लक्ष
आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका. मुंबई देशाच्या आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचं शहर मानलं जातं. याच मुंबईत मराठी माणसांचं अस्तित्व कायम टिकवण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. मुंबई आणि शिवसेना हे समीकरण प्रत्येकवेळी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कायम पाहायला मिळते. मात्र हेच समीकरण यंदा बदलताना दिसलं. शिवसेनेची मुंबई आणि मुंबई शिवसेनेची म्हणता म्हणता आता याच शिवसेनेच्या बालेकिल्यावर भाजपचं वर्चस्व निर्माण होताना दिसत आहे. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाने जोरदार बाजी मारली आहे.
मुंबई पालिकेच्या निवडणुकीत यंदा एकनाथ शिदेंची शिवसेना आणि भाजपचं पारडं जड झाल्याचे दिसून आले. या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या महापौरपदावर मराठीच माणूस बसला पाहिजे, अशी आक्रमक मागणी विरोधकांकडून केली जात आहे. 40 वर्षांच्या काळानंतर आता मुंबईच्या महापौरपदावर भाजपकडून कोणाला संधी मिळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
भाजपकडून महापौरपदासाठी कुणाचं नाव आघाडीवर?
प्रभाकर शिंदे
मुंबईतील भाजपचे प्रभाकर शिंदे यांचं नाव महापौरपदासाठी चर्चेत आहे. मुलुंड पूर्व परिसरा हा प्रभाकर शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक बाबींचा सखोल अभ्यास आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांनी पालिकेतील प्रशासकीय यंत्रणा आणि अर्थसंकल्पासाठी योगदान दिलं आहे. त्यामुळेसामाजिक क्षेत्रात जनतेशी बांधिलकी जपणारे आणि दांडगा जनसंपर्क असलेल्या शिंदे यांचं नाव चर्चेत आहे.
महापौरपदाच्या महिला राखीव गटातून तेजस्वी घोसाळकर यांचं नाव देखील आघाडीवर आहे. त्यांनी दहिसर प्रभागातून विजय खेचून आणला आहे. तेजस् घोसाळकर यांनी ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव केला. एखाद्या महिलेची महपौरपदी नियुक्ती केल्यानंतर भाजपची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
प्रकाश दरेकर
प्रकाश दरेकर यांचंही दहीसर भागात वर्चस्व आहे. भाजपाच्या प्रकाश दरेकर यांनी यंदाच्या निवडणुकीत मताधिक्याने विजय मिळवलाय. दरेकर हे आवश्यक सोयी सुविधांसाठी कायमच तत्पर असतात, असं बोललं जातं. त्यामुळे त्यांचही नाव महापौरपदासाठी आघाडीवर आहे. त्यांच्यासोबत मकरंद नार्वेकर आणि राजश्री शिवलकर यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.