राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात शाळेचे छत कोसळून ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू
सकाळी प्रार्थना सुरू असताना अचानक शाळेचे छत कोसळले
६० हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले
घटनास्थळी बचाव पथक, जेसीबीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू
राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळून ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. झालावाड जिल्ह्यातील पिपलोड गावातील एका सरकारी शाळेत ही धक्कादायक घटना घडली. शाळेमध्ये सकाळी प्रार्थना सुरू असताना अचानक छत कोसळलं. या घटनेत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर ६० पेक्षा जास्त विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचे छत कोसळून ४ मुलांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक मुलं गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. जखमी मुलांना मनोहरथाना सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात येत आहे. जखमींमधील काही मुलांची प्रकृती गंभीर आहे.
शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुलं शाळेत आली. शाळेमध्ये सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. ही घटना घडली त्यावेळी शाळेत प्रार्थना सुरू होती. या शाळेची इमारत खूपच जुनी असल्याची माहिती समोर आली आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शाळेची इमारत ओली आणि जीर्ण झाली होती. आज सकाळी मुले त्यांच्या वर्गात असताना अचानक एका वर्गाचे छत कोसळले. त्यामुळे तिथे बसलेली सर्व मुलं ढिगाऱ्याखाली दबली गेली. ही घटना घडताच शाळेत गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली.
या घटनेनंतर शाळेत आलेल्या मुलांच्या कुटुंबातील सदस्य रडू लागले. आपल्या जखमी झालेल्या मुलांना वाचवण्यासाठी त्यांची देखील धावाधाव सुरू आहे. सध्या जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा काढण्याचे काम सुरू आहे. जखमी मुलांना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात येत आहे. ज्या मुलांची प्रकृती गंभीर आहे त्यांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अनेक मुलं अडकली असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
राजस्थानमधील शाळेच्या छत कोसळण्याची घटना कुठे घडली?
झालावाड जिल्ह्यातील पिपलोड गावातील सरकारी शाळेत ही घटना घडली.
या घटनेत किती विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला?
४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक मुले ढिगाऱ्याखाली अडकली.
अपघाताचे कारण काय?
जुनी आणि जीर्ण इमारत आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे छत कोसळल्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.