Zp School : जिल्हा परिषद शाळेतील साहित्याची अज्ञाताकडून तोडफोड; शाळेचे मोठे नुकसान

Jalna News : सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्यामुळे गुन्हेगारांना ओळखणे कठीण झाले असून सौर ऊर्जा पॅनलच्या वायरिंगही तोडून नेण्यात आल्या आहेत. यामुळे शाळेतील वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे
Jalna News
Jalna NewsSaam tv
Published On

अक्षय शिंदे 

जालना : जिल्हा परिषद शाळेत कोणी नसताना अज्ञात व्यक्तीकडून शाळेतील साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे. यामध्ये शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे, पाण्याचे नळ आणि सौर ऊर्जा प्लेट ही तोडफोड करून मोठं नुकसान केले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या रांजणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला आहे. घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काही अज्ञात व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर नासधूस केल्याची घटना समोर आली. यामध्ये शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आले आहेत. तर सौर ऊर्जा प्लेट आणि पिण्याच्या पाण्याच्या नळ देखील तोडफोड करून मोठं नुकसान केलं. 

Jalna News
Amravati : उड्डाणपुलाचे काम रखडले; प्रधान सचिवांना १ लाख रुपयांचा दंड, कोर्टाकडून ३१ डिसेंबरचा अल्टिमेटम

सीसीटीव्ही फोडल्याने ओळख पटविणे कठीण 

सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्यामुळे गुन्हेगारांना ओळखणे कठीण झाले असून सौर ऊर्जा पॅनलच्या वायरिंगही तोडून नेण्यात आल्या आहेत. यामुळे शाळेतील वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. तोडफोडीच्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीच वातावरण असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

Jalna News
Rain Alert : पूर्व विदर्भात येलो अलर्ट; नागपुरसह अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा

शाळेत येऊन पोलिसांकडून पंचनामा 

दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे शाळेचे मोठे नुकसान झाले असून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी पाहणी करत घटनास्थळावरून पंचनामा देखील केला. याप्रकरणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी घनसावंगी पोलिसांना निवेदन देऊन गुन्हेगारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com