राजस्थानमध्ये (Rajasthan) तृतीयपंथी समाजाने अनोखा आदर्श निर्माण केला आहे. प्रत्येक जण या तृतीयपंथी (Kinnar) समाजाचे तोंडभरून कौतुक करत आहे. सध्या या तृतीयपंथीची सगळीकडे चर्चा होत आहे. यामागचे कारण देखील खूपच खास आहे. भरतपूरमध्ये राहणाऱ्या एका तृतीयपंथीने स्वखर्चाने १० गरीब मुलांचे लग्न लावून दिले आहे. या सामूहिक विवाहामध्ये दोन मुस्लिम मुलींचा देखील निकाह करण्यात आला. या सामूहिक विवाहाच्या माध्यमातून तृतीयपंथी नीतू यांनी सामाजिक समरसतेचा संदेशही दिला आहे.
महत्वाचे म्हणजे, नीतू (Neetu Mausi) यांनी आपल्या आयुष्यभराची संपूर्ण कमाई या सामाजिक कार्यासाठी वापरली आहे. या लग्नासाठी आलेला सर्व खर्च त्यांनी केला आहे. या सर्व मुलींचे लग्न प्रथा-परंपरेनुसार पार पडले. यावेळी सर्व सामान आणि सोन्याचे दागिनेही मुलींना देण्यात आले आहेत. याशिवाय लग्नातील पाहुणे आणि कुटुंबीयांसाठी जेवणाचीही पूर्ण व्यवस्था करण्यात आली होती.
तृतीयपंथी नीतू या नीतू आंटी या नावाने प्रसिद्ध आहेत. त्या भरतपूरमध्ये घरोघरी जाऊन पैसे गोळा करतात. यानंतर नीतू आंटी दरवर्षी गरीब मुलींचे लग्न लावतात. नीतू यांनी सांगितले की, आतापर्यंत त्यांनी 150 पेक्षा जास्त गरीब मुलींची लग्न लावून दिली आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांनी आयोजित केलेला हा 12 वा सामूहिक विवाह सोहळा आहे.
नीतू दरवर्षीप्रमाणे गरीब मुलींची लग्न लावून सामाजिक कार्य करत आहेत. नीतू किन्नर यांनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 10 गरीब मुलींचे लग्न लावून देण्यात आले. यामध्ये दोन मुली मुस्लिम समाजातील आहेत. त्यांचा निकाह मुस्लिम समाजातील रितीरिवाजानुसार पार पडला. या माध्यमातून नीतू यांनी समाजामध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याची भावान निर्माण व्हावी यासाठी देखील संदेश दिला.
नीतू आंटीने पुढे सांगितले की, तिने आयुष्यभर लोकांच्या घरी जाऊन पैसे गोळा केले आहेत. आता ती ही रक्कम इतरांच्या मदतीसाठी वापरत आहे. कन्यादान हे सर्वात मोठे दान आहे. म्हणूनच मी दरवर्षी स्वखर्चाने गरीब मुलींची लग्न करते.' नीतू यांचे असे म्हणणे आहे की, 'आपणही माणूस आहोत. कोणत्याही रूपात असो.पण आपण असे काहीतरी केले पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या जन्मात त्याचा लाभ मिळतो.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.