Bihar Crime News: वाचवा म्हणत ढसाढसा रडला, मात्र कोणी ऐकलं नाही; बंदुकीच्या धाकाने शिक्षकाचं बळजबरीने लग्न

Bihar News : बिहारच्या पाटणामध्ये एका शिक्षणाचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवत बळजबरीने त्याचं लग्न लावण्यात आल्याची घटना घडली आहे. गौतम कुमार, असे या शिक्षकाचे नाव आहे.
Bihar Crime News
Bihar Crime NewsSaam Tv
Published On

Bihar Crime News:

बिहारच्या पाटणामध्ये एका शिक्षणाचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवत बळजबरीने त्याचं लग्न लावण्यात आल्याची घटना घडली आहे. गौतम कुमार, असे या शिक्षकाचे नाव आहे. त्यांनी नुकतीच बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती.

ते शिक्षक झाल्यानंतर लगेचच तीन-चार जण त्याच्या शाळेत पोहोचले आणि बंदुकीच्या जोरावर त्याचे अपहरण केले. त्यानंतर 24 तासांतच त्याने बंदुकीच्या धाकावर अपहरण करणाऱ्या व्यक्तीच्या मुलीशी बळजबरीने लग्न लावून दिले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bihar Crime News
Fake Indian Rupee Note: बोगस नोटांचं रॅकेट उद्ध्वस्त; NIA च्या ४ राज्यांत धाडी, विदेशी कनेक्शन उघड

बिहारमध्ये अशा लग्नाला 'पकडौआ विवाह', असं म्हणतात. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. यातच काही दिवसांपूर्वीच पाटणा उच्च न्यायालयाने अशा प्रकारचे विवाह वैध ठरणार नाही, असे म्हटले होते. एका खटल्यात निकाल देताना न्यायालयाने म्हटले होते की, जबरदस्तीने किंवा दबावाखाली विवाह लावून देणे, हे हिंदू विवाह कायद्यानुसार ग्राह्य धरता येणार नाही. असे असतानाही बिहारमध्ये पकडौआ विवाहच्या घटना थांबत नसून यात वाढच दिसून येत आहे.  (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील वैशाली जिल्ह्यात शिक्षकाचे अपहरण करण्यात आले होते. नुकतेच त्यांची रेपुरा, पाटेपूरच्या शाळेत नियुक्ती करण्यात आली होती. कुमार हे बेपत्ता झाल्यानंतर बुधवारी रात्री त्यांच्या कुटुंबीयांनी रस्ता रोको करून निषेध केला. कुमार यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात राजेश राय नावाच्या व्यक्तीवर आरोप केला आहे. राय यांच्या कुटुंबीयांनी कुमार यांना जबरदस्तीने नेऊन त्यांची मुलगी चांदनीशी लग्न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Bihar Crime News
Wardha Crime: हिंगणघाटात पोषण आहाराच्या काळाबाजार; १ लाख १ हजार ६१५ रुपयांचा धान्यसाठा जप्त

एका वृत्तानुसार, जेव्हा कुमार यांनी हे लग्न करण्यास नकार दिला तेव्हा मारहाण करण्यात आली. लागण होत असतानाही ते मला वाचावा म्हणत ढसाढसा रडत होते, मात्र कोणीही त्यांच्या मदतीला आलं नाही. शेवटी बळजबरीने त्यांना लग्न करावं लागलं. अशा विवाहाबाबत पाटणा न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आरोपींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com