Fake Indian Rupee Note: बोगस नोटांचं रॅकेट उद्ध्वस्त; NIA च्या ४ राज्यांत धाडी, विदेशी कनेक्शन उघड

Fake Currency Racket: राष्ट्रीय तपास यंत्रणेला ४ राज्यात टाकलेल्या धाडीत बनावट नोटा, प्रिंटिंग पेपर, प्रिंटर आणि डिजिटल गॅझेट आढळून आले आहे. या धाडीत विदेशी कनेक्शन उघड झालं आहे.
NIA
NIASaam tv
Published On

Fake Indian Rupee Note Update:

राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी देशातील विविध भागात धाडी टाकून भारतीय बनावट नोटांच्या रॅकेटचा भंडाफोड केला. राष्ट्रीय तपास यंत्रणेला ४ राज्यात टाकलेल्या धाडीत बनावट नोटा, प्रिंटिंग पेपर, प्रिंटर आणि डिजिटल गॅझेट आढळून आले आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) टाकलेल्या धाडीत तस्करी आणि विभिन्न राज्यात टाकल्यानंतर विविध देशातील कनेक्शन उघड झालं आहे. मागच्या महिन्यात २४ नोव्हेंबरला नोंदवलेल्या एका प्रकरणाच्या अनुषंगाने यंत्रणेने छापेमारी केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

NIA
Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशना 4 डिसेंबरपासून होणार सुरुवात, सरकारने राजकीय पक्षांच्या नेत्यांची घेतली बैठक

या छापेमारीनंतर अधिकाऱ्याने म्हटलं आहे की,'विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार एनआयएच्या पथकाने महाराष्ट्रातील आरोपी राहुल पाटील उर्फ जावेद, उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर जिल्ह्यातील विवेक ठाकूर उर्फ आदित्य सिंह, कर्नाटकच्या बल्लारी जिल्ह्यातील महेंद्र, महाराष्ट्रच्या यवतमाळमधील संशियत शिवा पाटील, बिहारचा रोहतास जिल्ह्यातील शशी भूषण या सर्वांच्या परिसरात कारवाई केली'.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने या धाडीत बनावट नोटा जप्त केल्या आहेत. विवेक ठाकूर यांच्या घरातून ६६०० रुपये (५०० रुपये २०० रुपये आणि १०० रुपये) नोटा छापण्यासाठी लागणाऱ्या वस्तू सापडल्या आहेत. शिवा पाटील हा सीमेला लागून असलेल्या देशातून बनावट नोट्या छापण्याचं वस्तू खरेदी करायचा.

NIA
Oldest Mother Of Africa: वयाच्या ७० व्या वर्षी महिलेनं जुळ्या मुलांना जन्म दिला; बाळांसह आईची सर्वत्र चर्चा

एआयएच्या तपासात उघड झालं की, राहुल तानाजी पाटील बनावट नोटा पुरवण्याचं आश्वासन देऊन पैसे गोळा करण्यासाठी फसव्या पद्धतीतून मिळवलेल्या सीम कार्डचा वापर करायचा. तसेच महेंद्रच्या घरात नोटा छापण्यासाठी लागणारा प्रिंटर आढळला. यंत्रणेने तातडीने प्रिंटर जप्त केला आहे.

NIA
Delhi Liquor Policy: दिल्ली मद्यधोरण; संजय सिंग यांच्या अडचणीत वाढ, ईडीने दाखल केले ६० पानी आरोपपत्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com