Radhika Aapte News: 'मेड इन हेवन 2' सीरिज राधिकामुळे पुन्हा एकदा चर्चेत; बौद्ध पद्धतीने पार पडला शाही विवाह सोहळा, पाहा VIDEO

Radhika Aapte News: हा सीझन इतका सुपरहीट झाला की, एमी अवॉर्डसाठी देखील या चित्रपटासाठी निवड करण्यात आली आहे.
Radhika Aapte News
Radhika Aapte NewsSaam TV
Published On

Made In Heaven 2: राधिका आपटे या अभिनेत्रीने आपल्या हरहुन्नरी आभिनयाने आजवर लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी देखील राधिकाचं आणि तिच्या कामाचं कौतुक केलं आहे. (Latest Marathi News)

साल २०१९ साली प्रदर्शित झालेली 'मेड इन हेवन' ही वेब सीरिज तुम्ही नक्कीच पाहिली असेल. या सीरिजने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. हा सीझन इतका सुपरहीट झाला की, एमी अवॉर्डसाठी देखील याची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर या ताहत्यांना या सिरीजच्या दुसऱ्या सीझनची ओढ लागली.

Radhika Aapte News
Vasai- Virar Crime News : लॅपटॉप, दुचाकी, दागिने चाेरणारे अटकेत, 4 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

आता या वेब सीरिजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. तसेच याचे सात भाग प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. या सीरिजच्या पाचव्या एपिसोडने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कारण यामध्ये बौद्ध पद्धतीने राधिकाचा विवाह सोहळा पार पडलेला दाखवला आहे. लग्नातील रितीरिवाजांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी याची यावर प्रतिक्रिया दिलीये. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर या सीरिजनमधील दोन फोटो पोस्ट केलेत. यातील एका फोटोत राधिका पल्लवी या पात्रात आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आहेत.

Radhika Aapte News
Maharashtra Crime News: मुंबईसह नाशिक, अहमदनगरमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; ६ जणांना अटक, महाराष्ट्रात चाललंय तरी काय?

हा फोटो ट्वीट करत प्रकाश आंबेडकरांनी राधिकावर कौतुकाचा वर्षाव केलाय. "मला दलित स्त्री पात्रातील पल्लवीची जिद्द आणि प्रतिकार फार आवडला. तुम्ही सर्व वंचित आणि बहुजनांनी ही मालिका जरूर पहावी तरच तुम्ही तुमची ओळख सांगू शकाल." , असं कॅप्शन त्यांनी लिहिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com