Son Brutally Attacks and Kills Parents Under Alcohol Influence Saam Tv Marathi
देश विदेश

नशा डोक्यात गेली, पोटच्या मुलानं आई- वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाड घातली, दागिने घेऊन आरोपी फरार

Son Brutally Attacks and Kills Parents Under Alcohol Influence: राजस्थानमधील अलवरमधून धक्कादायक बातमी समोर. मद्यपी मुलाकडून वृद्ध आई वडिलांची कऱ्हाडीनं हत्या. हत्येनंतर आरोपी फरार.

Bhagyashree Kamble

  • राजस्थानमधून धक्कादायक घटना समोर.

  • पोटच्या मुलानं वृद्ध आई- वडिलांना संपवलं.

  • आरोपी आईचे दागिने घेऊन फरार.

राजस्थानातील अलवर येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका मुलानं वृद्ध पालकांची निर्घृण हत्या केली आहे. त्यानं आई- वडिलांवर कुऱ्हाडीने वार केले आहेत. दोघांना ठार मारून आरोपी तेथून फरार झाला आहे. फरार होण्यापूर्वी आरोपीनं आईचे दागिने चोरले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मद्यपी होता. दारूच्या नशेत त्याने पालकांवर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली.

ही भयंकर घटना अलवरमधील गोविंदगड येथे घडली आहे. ओमप्रकाश असे आरोपीचे नाव आहे. त्यानं वडील हरिराम जाटव (वय वर्ष ७०) आणि आई शांती देवी (वय वर्ष ६५) यांची निर्घृण हत्या केली. रात्रीच्या वेळेस त्यानं कुऱ्हाडीने वार करून आई - वडिलांना संपवलं. नंतर आरोपी आईचे पैंजण घेऊन फरार झाला. दुसऱ्या दिवशी वृद्ध दांम्पत्य दिसत नसल्यामुळे शेजारी घरात गेले. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं.

त्यानंतर जोडप्याच्या मोठ्या मुलाला आई - वडिलांच्या हत्येची माहिती देण्यात आली. मोहरपाल असे वृद्ध दांम्पत्याच्या मोठ्या मुलाचे नाव आहे. तो पत्नी आणि मुलांसह अलवरमध्ये राहतो. तर, आरोपी ओमप्रकाश हा त्यांचा लहान मुलहा असून, अलवरमध्ये राहतो. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली.

घटनेबाबत माहिती देताना स्टेशन ऑफिसर विजयपाल सिंह म्हणाले की, 'एफएलएल टीमने घटनास्थळावरून काही नमुने जमा केले आहेत. दोन्ही वृद्ध व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले आहे. शवविच्छेदन अहवालातून काही गोष्टी स्पष्ट होतील. सुरूवातीच्या तपासात ही हत्या रात्रीच्या वेळी झाल्याचे समजते. पोलिसांकडून आरोपी मुलाचा शोध सुरू आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Red Fort Blast : दिल्लीतील स्फोटात ८ जणांचा मृत्यू, हाय अलर्ट जारी

Maharashtra Live News Update : मुंबई, पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरात अलर्ट

Delhi Blast: दिल्लीत मोठा स्फोट, वाहनं पेटली; आग अन् धुराचे लोट; पाहा घटनेचा पहिला VIDEO

Aadhaar App: आधारचे नवे अ‍ॅप लॉंच, मोबाईलमध्येच वापरता येणार खास फिचर्स, घरबसल्या होतील सगळी कामे

Delhi Red Fort Blast: देशात खळबळ! दिल्लीत मोठा स्फोट, एकाचा मृत्यू|VIDEO

SCROLL FOR NEXT