Shreya Maskar
कैरीचे पन्हे बनवण्यासाठी कैरी, गूळ किंवा साखर, वेलची पावडर, पाणी आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते. यांचे प्रमाण योग्य घ्या.
कैरीचे पन्हे बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये कैरी उकडून साले काढून घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये कैरीचा गर काढून घ्या.
आता एका बाऊलमध्ये कैरीचा गर आणि गूळ घालून चांगले मिक्स करा. तुम्ही गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार निवड करा.
त्यानंतर मिश्रणात बारीक केलेली वेलची पूड मिक्स करून मिश्रण गाळून घ्या. अशाप्रकारे कैरीचा पल्प तयार झाला आहे.
तयार कैरीचा पल्प फ्रेश राहण्यासाठी हवाबंद बरणीत भरून फ्रिजमध्ये दोन ते तीन दिवस ठेवू शकता. त्यावर कैरीचा पल्प फ्रेश राहत नाही.
आता जेव्हा कैरीचे पन्हे प्यायचे असेल तेव्हा एका ग्लास थंड पाणी घेऊन त्यात कैरीचा पल्प आणि चिमूटभर मीठ टाकून चांगले मिक्स करा.
तुम्ही यात आवडीनुसार बर्फ टाकून कैरीचे थंडगार, आंबट गोड पन्हे प्या. तुम्ही एक ग्लास पिताच फ्रेश व्हाल. तसेच शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
कैरीमधील पोषक घटक उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी मदत करते.