Shreya Maskar
तांदळाचे पळी पापड प्रामुख्याने महाराष्ट्रात उन्हाळी वाळवणाचा भाग म्हणून बहुतेक घरांमध्ये बनवले जातात. तुम्ही देखील उन्हाळ्यात घरीच तांदळाचे पळी पापड बनवा.
तांदळाच्या पीठाचे पळी पापड बनवण्यासाठी तांदूळाचे पीठ, पाणी, जिरे , पांढरे तीळ , मीठ आणि पापड खार इत्यादी साहित्य लागते. यांचे योग्य प्रमाण घ्या.
तांदळाच्या पीठाचे पळी पापड बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात पाणी घालून मिक्स करून घ्या.
दुसऱ्या पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात चवीनुसार मीठ, जिरे, पांढरे तीळ, पापड खार घालून चांगले विरघळून घ्या.
पाण्याला एक उकळी आल्यावर त्यात तांदूळाचे भिजवून घेतलेले बॅटर मिक्स करा. मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मिश्रण सतत ढवळत राहा.
सुती कापडावर पळीच्या मदतीने गोलाकार पापड घाला. ३ ते ४ दिवस पापड वाळ्या कपड्यावर चांगले वाळवून घ्या.
गरमागरम भातासोबत कुरकुरीत तांदळाच्या पळी पापडांचा आस्वाद घ्या. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हा पदार्थ उन्हाळ्यात आवर्जून बनवतात.