Shreya Maskar
रविवार म्हटले की आराम आला. त्यामुळे घरीच सिंपल पद्धतीने चटपटीत रगडा पॅटीस बनवा. ही रेसिपी घरी ५-१० मिनिटांत तयार होईल.
रगडा बनवण्यासाठी पांढरे वाटणे , हळद, मीठ, जिरे, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, तेल इत्यादी साहित्य लागते.
पॅटीस बनवण्यासाठी बटाटे, मीठ , हळद, लाल तिखट, कॉर्नफ्लॉवर, तेल, चिंच- खजूर गोड चटणी, हिरवी चटणी, कांदा, कोथिंबीर, शेव आणि लिंबू इत्यादी साहित्य लागते.
रगडा पॅटीस बनवण्यासाठी सर्वप्रथम भिजवलेले पांढरे वाटणे कुकरमध्ये शिजवून घ्या. यात तुम्ही थोडे तेल टाका.
पॅनमध्ये तेल गरम करून यात जिरे , आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या. यात हळद, मीठ घालून शिजवलेले वाटणे घालून घट्टसर रगडा तयार करा.
दुसऱ्या बाऊलमध्ये शिजवलेले बटाटे मॅश करा. त्यात मीठ, हळद, तिखट आणि कॉर्नफ्लॉवर घालून चांगले मळून घ्या. याचे छोटे गोळे करून टिक्की सारख्या पॅटीस बनवा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात पॅटीस गोल्डन फ्राय करा. पॅटीस तळताना गॅस मंद आचेवर ठेवून द्या. जेणेकरून ते जळणार नाही.
आता एका बाऊलमध्ये खुसखुसशीत पॅटीस आणि त्यावर गरमागरम रगडा टाकून रगडा पॅटीसचा आस्वाद घ्या. यावर हिरवी चटणी, गोड चटणी, कांदा, शेव, कोथिंबीर आणि लिंबू रस घाला.