शरद पवारांचा धनंजय मुंडेंना धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, मुंडेंवर आरोप करत सगळंच बाहेर काढलं

Former Parli Mayor Joins Sharad Pawar Group Alleging Corruption: परळीच्या माजी नगरध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
Former Parli Mayor Joins Sharad Pawar Group Alleging Corruption
Former Parli Mayor Joins Sharad Pawar Group Alleging CorruptionSaam
Published On
Summary
  • परळीच्या माजी नगराध्यक्षांकडून पक्षाला रामराम

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्षप्रवेश करण्याचा निर्णय.

  • परळीत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीत राजकीय समीकरणं झपाट्याने बदलू लागली आहेत. अशातच परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी परळी नगरपरिषदेत विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला असून, परळीत शरदचंद्र पवार गटाची ताकद वाढली आहे.

या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड तसेच पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड देखील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, परळीतील नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव आहे. यामुळे दीपक देशमुख यांच्या पत्नी संध्या देशमुख ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.

Former Parli Mayor Joins Sharad Pawar Group Alleging Corruption
रोड, बुलेट ट्रेन अन् विमानतळालाही जोडणार, Underground road networkला हिरवा कंदील, वाहतूक कोंडीतून सुटका

या पक्षप्रवेशाबाबत दीपक देशमुख म्हणाले, 'मी पक्षनिष्ठ नसून व्यक्तीनिष्ठग माणूस आहे. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात पक्षप्रवेश होणार आहे', असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, देशमुख यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे माजी मंत्री धनंजय देशमुख यांना धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. यावेळी देशमुख यांनी ही धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पक्षप्रवेशावेळी देशमुख म्हणाले, 'आधी माझे तिकीट कापले गेले होते. यानंतर मी अपक्ष उभा राहिलो. परळीतील अर्धवट विकासकामांमुळे मी हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत मी पंकजा मुंडे यांचं काम केलं. नंतर विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांचं काम केलं. परळीत बोगस मतदानाचा प्रकार सुरू होता. बोगस मतदानाबाबता मी धनंजय मुंडेंना माहिती दिली होती. आपण निवडून येऊ, पण हे प्रकार थांबले पाहिजेत', असं देशमुख म्हणाले. 'गेल्या दीड महिन्यांपासून मी प्रचार करीत आहे. परळीतील जनता माझ्यासोबत आहेत', असंही त्यांनी म्हटलं.

Former Parli Mayor Joins Sharad Pawar Group Alleging Corruption
मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट; आरोपीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, संतोष देशमुखांच्या भावाचं कनेक्शन काय?

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजाभाऊ फड यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आमदार धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील राजाभाऊ फड यांना पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजाभाऊ फड यांना बळ देण्यासाठी ही जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com