Meat and mutton shops remain closed in Raipur after the municipal corporation ordered a three-day ban during upcoming religious festivals. Saam Tv
देश विदेश

चिकन आणि मटणाची दुकाने ३ दिवस बंद राहणार, प्रशासनाकडून आदेश जारी

Meat And Mutton Shops Closed For Gudi Padwa Ram Navami Mahavir Jayanti: छत्तीसगडमधील रायपूर शहरात गुडीपाडवा, रामनवमी आणि महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने मांस व मटण दुकाने तीन दिवस बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Omkar Sonawane

छत्तीसगडमधील रायपूर शहरात येणाऱ्या धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने मांस आणि मटणाचे दुकाने तीन दिवस बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. रायपूर महानगरपालिकेच्या महापौर चौबे यांच्या सूचनेनुसार 20 मार्च, 27 मार्च आणि 31 मार्च 2026 रोजी महानगर क्षेत्रात मांस आणू मटण विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल.

महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार 20 मार्च रोजी गुडीपाडवा आणि 27 ला रामनवमी तसेच 31 तारखेला महावीर जयंती निमित्त रायपूर महानगरपालिका क्षेत्रातील कत्तलखाने आणि सर्व मटणाचे दुकाने ही बंद राहतील. छत्तीसगड सारकरच्या नागरी प्रशासन आणि विकास विभागच्या सुचनांचे पालन करून रायपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने हा आदेश जारी केला आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य आधिकारी डॉक्टर तृप्ती पाणिग्रही यांनी या संदर्भात अधिकृत सूचना जारी केली आहे.

उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल

बंद दिवसांत जर कोणतेही हॉटेल, रेस्टॉरंट किंवा दुकान मांस विकताना आढळले तर त्या वस्तू जप्त केल्या जातील आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महानगरपालिका प्रशासनाने सर्व दुकानदार आणि हॉटेल चालकांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

का बंद केली जात आहेत मटण दुकाने?

हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाचे सण जवळ येत असल्याने महापालिकेने मटण दुकाने काही दिवस बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तसेच पुढे रामनवमी आणि महावीर जयंती हे सणही येत असल्याने धार्मिक भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत हिंदुत्ववादी संघटनांनीही मटण दुकाने बंद ठेवण्याची मागणी केली होती, त्यानंतर महापालिकेकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT